ट्रक मालक संघाचा इशारा निवेदन: धान्य फरकाचा भुर्दंड नको
By admin | Published: April 26, 2016 12:16 AM2016-04-26T00:16:35+5:302016-04-26T00:16:35+5:30
जळगाव : मुंबईहून ट्रकने आणलेले कडधान्य मोजणीत येथे कमी भरते. त्याची भरपाई ट्रक मालकाच्या भाड्यातून कपात करणे बंद करावे अन्यथा भविष्यात आंदोलन छेडले जाईल असा इशारा उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स व धुळे जिल्हा ट्रक मालक असो.ने ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशनला दिला आहे.
Next
ज गाव : मुंबईहून ट्रकने आणलेले कडधान्य मोजणीत येथे कमी भरते. त्याची भरपाई ट्रक मालकाच्या भाड्यातून कपात करणे बंद करावे अन्यथा भविष्यात आंदोलन छेडले जाईल असा इशारा उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स व धुळे जिल्हा ट्रक मालक असो.ने ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशनला दिला आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबईहून जळगाव येथे मोठ्या प्रमाणात कडधान्य पॉलिशसाठी आणले जात असते. आणलेल्या धान्याची तेथे मोजणी झाली असते व येथे आल्यावरही ती केली जाते. बर्याच वेळेस हे धान्य ओले असते त्यामुळे भरतानाचे त्याचे वजन व येथे आणल्यानंतरच्या वजनात फरक पडतो. वजनात धान्य कमी भरल्यावर दाळमिल उद्योजक ट्रक मालकांच्या भाड्यातून त्याचे पैसे वसूल करतात. याचा ट्रक मालकांना मोठा फटका बसत असतो. बर्याच वेळेस वजन काट्यांमध्येही फरक असतो. होणारी ही कपात बंद न केल्यास भविष्यात ट्रक ओनर्सतर्फे आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. हे निवेदन दाळ उद्योजक प्रेम कोगटा यांना देण्यात आले. यावेळी ट्रक मालक असो चे. सेक्रेटरी मनोज राघवन, मनोहर चौधरी, गुरुमितसिंग मदन, शकील मन्यार, रहीमभाई, निसारभाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.