Travel Tips: रेल्वेतून प्रवास करताना सामान जाणार नाही चोरीला जर वापराल 'ही' ट्रिक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 06:51 PM2022-06-15T18:51:06+5:302022-06-15T18:58:11+5:30
ट्रेनमधून लांबचा प्रवास करत असताना आपल्या सामानाची विशेष काळजी घ्यावी लागते. नाहीतर सामान अगदी सहज चोरीला जाण्याची शक्यता असते.
आपल्यापैकी अनेकांना फिरण्याची खूप आवड असते. कुणाला ग्रुपमध्ये फिरायला आवडतं तर कोणाला सोलो म्हणजेच एकटं फिरायला आवडतं. मात्र प्रवास कोणताही असो आपल्या सामानाची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. ट्रेनमधून लांबचा प्रवास करत असताना आपल्या सामानाची विशेष काळजी घ्यावी लागते. नाहीतर सामान अगदी सहज चोरीला जाण्याची शक्यता असते (How To Protect Your Bag From Stealing During Train Travel).
मोठ्या सामानासोबतच आपल्यापैकी बहुतेक जण एक हँडबॅग आपल्यासोबत बाळगतात. ज्यामध्ये ते रोख पैसे, पाकीट, लॅपटॉप, फोन इत्यादी सर्व मौल्यवान वस्तू ठेऊ शकतील. ही बॅग मात्र आपण इतर सामानासोबत सीटखाली न ठेवता आपल्या बर्थवर ठेवतो. या बर्थवरून म्हणजेच सीटवरून आपली ही बॅग चोरी होण्याची जास्त शक्यता असते.
आज आम्ही तुम्हाला काही युक्त्या सांगणार आहोत (A Trick To Protect Your Bag In Train). त्या वापरल्यास तुमच्या बर्थवरून तुमची बॅग चोरीस जाणार नाही. बर्थवर बॅग ठेवताना आपण ती डोक्याच्या दिशेला ठेवावी. या ठिकाणाहून आपली बॅग चोरी होण्याची शक्यता कमी असते. मात्र बर्थवर जागा कमी असल्याने झोपताना तुम्ही तुमची बॅग डोक्याजवळ ठेऊ शकत नाही. अशावेळी तुम्ही बॅग पायाजवळ ठेवता आणि तिथे ही बॅग अतिशय असुरक्षित नसते. कारण तुम्ही झोपेत असताना कोणीही सहजपणे तुमच्या पायाजवळील बॅग काढून घेऊ शकतं.
यावर एक उत्तम उपाय आहे. जेव्हा तुम्ही रेल्वे प्रवासाला निघता तेव्हा तुमच्याकडे अंगावर पांघरण्यासाठी एखादी बेडशीट, चादर किंवा शाल असते. झोपताना पायाकडे चादरीच्या एका टोकाला तुमची बॅग एक दोन गाठी मारून घट्ट बांधून घ्या आणि ही गाठ शक्यतो कोणाच्या नजरेस पडणार नाही याची काळजी घ्या. यामुळे जेव्हा एखादा चोर तुमची बॅग खेचून पळण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा बॅगसोबत तुमची चादरही ओढली जाईल आणि तुम्हाला लगेच जाग येईल. अशाप्रकारे तुम्ही रेल्वेमध्ये तुमच्या महत्वाच्या बॅगेची काळजी घेऊ शकता.