गिर्यारोहण किंवा ट्रेकिंगसाठी महत्त्वाच्या टिप्स, ही काळजी घ्याल तर आनंद दुप्पट होईल!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 12:40 PM2019-01-09T12:40:48+5:302019-01-09T12:44:33+5:30
गिर्यारोहण किंवा पर्वतारोहण ही एक आउटडोर अॅक्टिविटी आहे जी रोमांचक गोष्टी करणाऱ्या लोकांच्या यादीत आवर्जून असते. इतकेच नाही तर एक वेगळा अनुभव देण्यासोबतच याने तुम्ही फिट सुद्धा राहता.
पर्वतारोहण ही एक आउटडोर अॅक्टिविटी आहे जी रोमांचक गोष्टी करणाऱ्या लोकांच्या यादीत आवर्जून असते. इतकेच नाही तर एक वेगळा अनुभव देण्यासोबतच याने तुम्ही फिट सुद्धा राहता. भारतात असे भरपूर डोंगरं आहेत जिथे ट्रेकिंग कठिणच नाही तर फार धोकादायकही आहे. पण तरिही हे डोंगर सर करणाऱ्यांची कमतरता नाहीये. अलिकडे ट्रेकिंगची फारच क्रेझ वाढली आहे. पण यासाठी कराव्या लागणाऱ्या तयारीची अनेकांना माहितीच नसते. त्यामुळे आम्ही काही ट्रेकिंगची किंवा पर्वकारोहणची आवड असणाऱ्यांसाठी काही खास टिप्स घेऊ आलो आहोत, जेणेकरुन या टिप्सच्या माध्यमातून त्यांना ट्रेकिंगचा आनंदही घेता येईल आणि फिटही राहतील.
पर्वातारोहणाचं ट्रेनिंग
डोंगरांवर चढाई करण्यासाठी त्यांच्याबाबत माहिती घेणेही गरजेचं असतं. यासाठी अनेक कोर्सेसही चालतात. या कोर्समध्ये तुम्हाला डोंगरांवर चढताना नकाशाला कसं फॉलो करायचं, रोप वर्क आणि डोंगरांवरील वातावरणाची पूर्ण माहिती दिली जाते. ही संपूर्ण माहिती काळजीपूर्वक फॉलो करावी लागते. तसं केलं नाही तर तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे नेहमी एका चांगल्या संस्थेकडूनच हा कोर्स करावा.
तयारी आणि प्लॅनिंग
डोंगरांवर सुखरुप पोहोचण्यासोबतच तुम्ही चढतानाचा प्रत्येक क्षण तेव्हाच एन्जॉय करु शकाल जेव्हा तुम्ही पूर्ण तयारीने जाल. मग ती शॉर्ट क्लायम्बिंग असो वा दोन महिन्यांची असो. तयारीचा अर्थ आहे फिजिलकी, मेंटली फिट ठेवणे आणि प्लॅनिंगचा अर्थ आहे पर्वातारोहणाच्या ट्रेनिंगबाबत माहिती घेणे.
एक्सरसाइजसाठी योग्य फुटवेअर
पर्वातारोहणाच्या कोर्समध्ये भलेही अॅडवेंचर आणि आनंद असतो पण याचा अर्थ हा नाही की, महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं. यातील एक महत्त्वाचा भाग आहे फुटवेअर्स. डोंगरांवर चढण्यासाठी फॅशनेबल नाही तर मजबूत आणि कम्फर्टेबल फुटवेअर्सची गरज असते. जर तुम्ही उन्हाळ्यात ट्रेकिंगचा प्लॅन करत असाल तर स्टिफ बूट्स खरेदी करा आणि हिवाळ्यात करत असाल तर क्रॅंपन रेटेट बूट्स खरेदी करा.
वातावरणाची योग्य माहिती
पर्वातारोहणासाठी किंवा ट्रेकिंगसाठी निघण्याआधी तेथील लोकांशी वातावरणाबाबत जाणून घ्या. कारण डोंगरांवरील वातावरण लगेच बदलत असतं. जे अनेकदा धोकादायक ठरु शकतं. तसेच ट्रेनिंगदरम्यान धोकादायक वातावरणात स्वत:चा बचाव कसा करावा याचीही पूर्ण माहिती घ्यावी.
खाण्याची तयारी
पर्वातारोहणाला निघाल्यावर तुमच्याकडे असे पदार्थ असले पाहिजे जे रेडी टू इट असावेत. शिजवण्याची किंवा भाजण्याची गरज पडू नये. भूक लागली की, लगेच खाता यावेत. न्यूट्रिशन आणि एनर्जी असलेले हे पदार्थ असावेत सोबतच कमी वजनाचेही असावेत. जेणेकरुन वर डोंगरावर चढताना त्रास होऊ नये.
इमरजन्सी शेल्टर
डोंगरावर चढताना होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या दुर्घटनेपासून बचाव करण्यासाठी एमरजन्सी शेल्टर गरजेचं आहे. यात दहा ते बारा लोक एकत्र राहू शकतात. यांची गरज अनेकदा पडतेच.
फर्स्ट एड किट
इतर गोष्टींप्रमाणेच फर्स्ट एड किटही तितकीच गरजेची आहे. डोंगरावर चढताना तुमची तब्येत बिघडू शकते किंवा तुम्ही जखमी होऊ शकता. अशावेळी वेळीच उपचार करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक औषधे असायला हवी.