परदेशात पहिल्यांदाच फिरायला जाताय? या टिप्सने प्रवास करा आणखी मजेदार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 01:19 PM2018-09-18T13:19:00+5:302018-09-18T13:19:35+5:30
परदेशात फिरायला जाण्याचा एकीकडे प्रचंड उत्साह असतो तर दुसरीकडे थोडी भीतीही असते. कमी बजेटमध्ये सगळंकाही मॅनेज करणं हाही एक महत्त्वाचा मुद्दा असतो.
(Image Credit : buro247.my)
परदेशात फिरायला जाण्याचा एकीकडे प्रचंड उत्साह असतो तर दुसरीकडे थोडी भीतीही असते. कमी बजेटमध्ये सगळंकाही मॅनेज करणं हाही एक महत्त्वाचा मुद्दा असतो. साधं एका गावातून दुसऱ्या गावात फिरायला गेल्यावर काहीना काही अडचणींचा सामना करावा लागतो. मग एक देश सोडून दुसऱ्या देशात गेल्यावर तर अडचणी येणारच. त्यामुळे परदेशात पहिल्यांदाच फिरायला जाताना काही गोष्टींची काळजी फार गरजेचे आहे. चला जाणून घेऊ काय आहेत त्या गोष्टी....
हॉटेलऐवजी होस्टेलमध्ये थांबा
पहिल्यांदा परदेश दौरा करत असताना अनेक गोष्टींसोबत बजेटचा विचार करणे सर्वात महत्त्वाची बाब आहे. अशावेळी हॉटेलमध्ये खूप जास्त पैसे देऊन राहण्यापेक्षा एखाद्या होस्टेलमध्ये थांबा. हे तुमच्या बजेटसाठीही चांगलं ठरेल आणि तिथे वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या लोकांशीही तुमची ओळख होईल. हे तुमच्या प्रवासासाठीही चांगलं ठरेल. हॉटेलबाबत जास्त विचार करुन फायदाही नाही कारण तुमचा जास्तीत जास्त वेळ हा बाहेर फिरण्यात जातो.
जास्त दिवसांची बुकींग नका करु
असे यासाठी कारण नवीन जागेवर गेल्यावर खूप जास्त पर्यायांबाबत आपल्याला माहिती नसतं. काही दिवस राहिल्यानंतर जर तुम्हाला दुसरा पर्याय मिळाला जर तुम्ही सहजपणे चेक-आऊट करुन तिथे शिफ्ट होऊ शकता. यासोबतच जिथेही थांबाल त्या जागेचा पत्ता आपल्या डायरीमध्ये नोट करुन घ्या. कारण प्रवासात फोन बंद झाला तर अडचण येऊ शकते.
जास्त कॅश सोबत ठेवू नका
तुम्ही तुमच्या इंटरनॅशनल डेबिट कार्डने कॅश काढू शकता आणि जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर प्रीपेड ट्रॅव्हल कार्डचा पर्यायही असतो. हे कार्ड अॅक्टिवेट होण्यासाठी केवळ एका दिवसाचा वेळ लागतो. पण जिथेही फिरायला जाल तेथील चलन सोबत ठेवा, कारण वेळेवर काहीही काम पडू शकतं.
पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा
बाहेरील काही देशांमध्ये प्रायव्हेट टॅक्सीच्या तुलनेत पब्लिक ट्रान्सपोर्ट जास्त स्वस्त आणि चांगली असते. सोबतच पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये उपस्थित असलेल्या लोकांशी संवाद करुन तुम्ही आणखीही काही फिरण्याच्या जागांबाबत माहिती घेऊ शकता.
एअरपोर्टवर सिम कार्ड घेणे टाळा
दुसऱ्या देशात जाऊन सिम कार्ड खरेदी करणेही एक महत्त्वाचं काम आहे. पण एअरपोर्टवरुन सिम कार्ड खरेदी करण्याऐवजी लोकल सुपर मार्केट्समधून खरेदी करणे कधीही चांगले. इथे तुम्हाला कमी पैशांमध्ये सिम मिळेल. एअरपोर्टवर याची जास्त किंमत घेतली जाते.
लोकल रेस्टॉरंटमध्ये खाण्याची मजा
वेगवेगळ्या पदार्थांवरुन त्या देशाच्या संस्कृतीबाबत जाणून घेण्यास मदत होते. मोठ-मोठ्या हॉटेल्समध्ये भलेही तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे पदार्थ मिळतील. त्या देशातील लोकल रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे पदार्थ चाखायला मिळतील.