व्हेकेशन प्लॅनिंग करताना ट्रॅव्हल एजन्टची 'अशी' घ्या मदत!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 11:28 AM2019-03-23T11:28:30+5:302019-03-23T11:28:52+5:30
एक आनंददायी आणि मनाला शांतता देणारी ट्रिप सर्वांनाच हवी असते. पण यासाठी पैसे खर्च करणं काहींना पसंत असतं तर काहींना नसतं.
(Image Credit : annarborapartments.net)
एक आनंददायी आणि मनाला शांतता देणारी ट्रिप सर्वांनाच हवी असते. पण यासाठी पैसे खर्च करणं काहींना पसंत असतं तर काहींना नसतं. पण जर तुम्ही कुठेतरी लांब फिरायला जात असाल आणि १० दिवसांची वगैरे सुट्टी असेल तर याचं प्लॅनिंग एखाद्या ट्रॅव्हल एजंटकडून केलेलं कधीही चांगलं होईल. तुमचा प्रवास अविस्मरणीय करण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील. चला जाणून घेऊन ट्रॅव्हल एजंटकडून तुम्ही काय मदत घेऊ शकता.
तिकीटावर मिळणारे ऑफर्स आणि डिस्काऊंट्स
ट्रॅव्हलची वाढती क्रेझमुळे यासंबंधी सुविधांमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारतातच नाही तर परदेशात येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी अनेक फ्लाइट उपलब्ध आहेत. यात काही खास दिवसांमध्ये प्रवास करण्यावर डिस्काऊंट्स आणि ऑफर्स दिल्या जातात. जर तुम्ही ट्रॅव्हल एजंटकडून तिकीट बुक कराल तर त्यांना कोणती कंपनी किती सूट देत आहे हे याची माहिती देण्यास सांगा. त्यानंतरच तिकीट बुक करा.
कधी बुक कराल तिकीट
लांबचा प्रवास करणार असाल तर तिकीट साधारण २ ते ४ महिन्यांआधीच बुक करा. वेळेवर तिकीट बुक कराल तर ते तुम्हाला महागाडं पडू शकतं. तसेच फ्लाइट्सनुसार तिकीटही मिळत नाही. याबाबतची माहिती तुम्ही ट्रॅव्हल एजंटकडून घेऊ शकता.
तिकीट कॅन्सलची माहिती
प्रवासाची पूर्ण तयारी झाली आहे आणि तिकीटही बुक झालं आहे. पण अचानक असं काही घडलं की, तुम्हाला प्रवास रद्द करायचं असेल तर घाबरण्याची गरज नाही. तुम्ही तिकीट रद्द करून पैसे परत मिळवू शकता. प्रवासाच्या २४ तास आधी तिकीट रद्द करण्याची सुविधा मिळते. याची संपूर्ण प्रक्रिया ट्रॅव्हल एजंटकडून समजून घेणे गरजेचे आहे.
थांबण्याची व्यवस्था
तुम्ही डेस्टिनेशनला पोहोचल्यावर तिथे थांबण्याची काय व्यवस्था आहे याची माहिती तुम्हाला आधीच असली पाहिजे. एअरपोर्टहून हॉटेलला जाण्याची काय सुविधा आहे, हे तुम्हाला माहीत असायला हवं. तसेच रस्त्यांचीही थोडी माहिती असावी. जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि तुम्ही अधिक एन्जॉय करू शकाल.
फिरण्यासाठी कोणतं ठिकाण परफेक्ट?
तुम्ही जर परदेशात फिरायला जात असाल तर वातावरणानुसार कोणतं ठिकाण फिरण्यासाठी बेस्ट असेल हे माहीत असायला हवं. याची यादी सर्वातआधी तयार करून घ्या. तुमचं बजेट, वातावरण या सर्व गोष्टींचा विचार करून डेस्टिनेशनचं सिलेक्शन करावं.