कधीही न विसरता येणारा Valentine's Day साजरा करण्यासाठी पार्टनरला 'इथे' घेऊन जा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 03:12 PM2020-02-03T15:12:09+5:302020-02-03T15:17:02+5:30

वॅलेनटाईन वीक हा नेहमी खास असतो.

Valentine's Day; locations for travel with partner on valentine day | कधीही न विसरता येणारा Valentine's Day साजरा करण्यासाठी पार्टनरला 'इथे' घेऊन जा!

कधीही न विसरता येणारा Valentine's Day साजरा करण्यासाठी पार्टनरला 'इथे' घेऊन जा!

Next

 व्हॅलेनटाईन वीक हा नेहमी खास असतो. पण या दिवसाला स्पेशल बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या डेटला लोक जात असतात.  नेहमी कामामुळे आपल्याला वेळ नसतो. म्हणून पार्टनरला मनासारखा वेळ देता येत नाही. जर तुम्ही  व्हॅलेनटाईन डे ला कुठेही  जाण्याचा प्लॅन केला नसेल तर आज आम्ही तुम्हाला काही खास ठिकाणांबदद्ल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी जाऊन तुमची पार्टनर तुमच्यावर खूप खूश  होईल.

आग्रा

(image credit- hindiscreen.com)

प्रेमाचं प्रतिक समजलं जाणारी ताजमहल ही वास्तू आग्रा येथे आहे. या ठिकाणी जगभरातून पर्यटक येत असतात. जर तुम्ही तुमच्या पार्टनरला  व्हॅलेनटाईन डे साठी या ठिकाणी घेऊन गेलात तर पार्टनरला खूप आनंद होईल. ताजमहलाचं आर्किटेक्चरल शैली पर्शियन, ओट्टोमन, भारतीय आणि इस्लामिक आर्किटेक्चरच्या घटकांची एक अनोखी संमिश्रता आहे. चार बाग हे संकुल सुमारे 300 मीटर चौरस मीटर चारबाग या मोगलच्या बागेत वेढलेले आहे. पार्टनरला सरप्राईज आणि आनंद देण्यासाठी यापेक्षा सुंदर ठिकाण तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही. तुम्ही रेल्वेने या  ठिकाणी जाऊ शकता. 

केरळ

(image credit-culture trip)

केरळला पार्टनर सोबत आनंदाचे क्षण एन्जॉय करण्यासाठी तुम्ही हाऊस बोटीत केरळमध्ये करू शकता. शांत समुद्रात तुम्ही आपल्या पार्टनरसोबत हाऊस बोटीत राहून  व्हॅलेनटाईन डे साजरा करू शकता.  केरळ राज्यातील कोल्लम  या ठिकाणी सर्वात जास्त लोक याचा आनंद घेतात.  केरळची राजधानी तिरूवनंतपुरम या ठिकाणांपासून कोल्लम ८० किलोमीटर अंतरावर आहे.  अष्टमुडी हा झरा आणि त्याच्या आजूबाजूला तुम्ही निसर्गसौंदर्याचा आनंद घेऊ शकता. 


केरळ राज्यातील  कोल्लम रेल्वे स्थानक वेगवेगळ्या मार्गानी  भारतातील शहरांशी जोडले गेले आहे.   या ठिकाणी जर तुम्ही विमानाने जात असाल तिरुवनंतपुरम हे रेल्वे स्थानक जवळ आहे. जहाजाने सुद्दा तुम्ही एलेप्पीपासून  कोल्लमपर्यंत येऊ शकता.  या ठिकाणी राहण्यासाठी साध्या हॉटेल्सपासून  फाईव स्टार हॉटेसपर्यंत वेगवेगळ्या सुविधा आहेत.  या ठिकाणची खासियत असेलेले हाऊस बोटींग तुम्हाला फार आवडेल. ( हे पण वाचा-एन्जॉय करण्यासाठी कोकणातली 'ही' पर्यटन स्थळं आहेत बेस्ट, कमी खर्चात जास्त मजा)

मसूरी

गर्दिपासून लांब असलेल्या या ठिकाणी तुम्ही  व्हॅलेनटाईन डे साजरा करू शकता. उत्तराखंडच्या पर्यटनाचे आकर्षण असलेले मसूरी हे पर्यटन स्थळ आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून मसूरीला विशेष महत्त्व आहे. उत्तराखंड ची राजधानी डेहराडून पासून 28 किलोमीटर अंतरावर उंच डोंगरांच्या रांगेत मसूरी हे थंड हवेचे सुंदर ठिकाण वसलेले आहे तेथे जाण्यासाठी रस्ते चांगले आहेत. डिसेंबर ते फेब्रुवारी बर्फाच्छादित प्रदेश बऱ्यापैकी असतो.  हॉटेल्स मसूरी पासून खाली सात-आठ किलोमीटर अंतरावर डोंगरउतारावर आहेत. या उतारावरील हॉटेल्समध्ये समोर पाहिले तर खाली डेहराडून शहर रात्रीच्या अंधारात चमचमत असते आणि वर पाहिले तर मसूरी गाव अंधारात चमचमत असते. 

लॅंसडाउन हे उत्तराखंडमधील हे पर्यटन खूप प्रसिध्द अनेक पर्यटकांचा ओढा या ठिकाणी असतो. आणि वॅलेनटाईन डे साजरा करण्यासाठी  तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. या ठिकाणचे मनमोहक सौंदर्य तुमचं मन आकर्षीत करून घेईल. ( हे पण वाचा-भारतीयच नाही तर परदेशी पर्यटकांना सुद्धा भुरळ घालेलं औरंगाबादची 'ही' नवीन गोष्ट)

Web Title: Valentine's Day; locations for travel with partner on valentine day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.