केवळ बुटक्या लोकांचं एक असंही रहस्यमय गाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 12:34 PM2019-02-13T12:34:47+5:302019-02-13T12:53:19+5:30

पृथ्वीवर सामान्यांपेक्षा उंचीने कमी असलेल्या लोकांची संख्या फारच कमी आहे. त्यांना बुटके लोक असेही म्हटले जाते.

A village where only dwarf lives | केवळ बुटक्या लोकांचं एक असंही रहस्यमय गाव!

केवळ बुटक्या लोकांचं एक असंही रहस्यमय गाव!

googlenewsNext

पृथ्वीवर सामान्यांपेक्षा उंचीने कमी असलेल्या लोकांची संख्या फारच कमी आहे. त्यांना बुटके लोक असेही म्हटले जाते. या लोकांची उंची सामान्यांपेक्षा फार कमी असते. तसेच त्यांचे फीचर्सही लहानच असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, चीनमध्ये एक असं गाव आहे जिथे केवळ हे बुटके लोक राहतात. चीनच्या शिचुआन प्रांतातील यांग्सी नावाच्या गावातील बुटक्या लोकांची लोकसंख्या जवळपास ५० टक्के आहे. 

(Image Credit : Procaffenation)

या लोकांची उंची २ फूट १ इंच पासून ते ३ फूट १० इंच इतकी आहे. पण या गावात इतके लोक कमी उंचीचे का आहेत? याचा शोध घेण्यासाठी संशोधकांनी वेगवेगळे रिसर्च केलेत. पण त्यांच्या हाती ठोस असं काही लागलं नाही. सर्वातआधी १९५१ मध्ये या गावात एका गंभीर आजाराने थैमान घालतं होतं. त्यानंतर सर्वांची स्थिती विचित्र झाली होती. या गंभीर आजाराचा गावातील लोकांवर इतका प्रभाव झाला की, गावात जितकेची बाळ जन्माला आलेत त्यांची उंची खुंटली. 

या प्रांतात १९११ पासून अशा कमी उंचीच्या लोकांना पाहिलं जात असल्याचंही सांगितलं जातं. पण अधिकृतपणे १९५१ मध्ये याचे पुरावे मिळाले. त्यानंतर अनेक संशोधकांनी वातावरण, पाणी आणि मातीवर रिसर्च केले. पण त्यांना याचं खरं कारण अजूनही कळू शकलं नाही. तसेच आता या लोकांमध्ये काही सुधारणाही बघायला मिळत आहेत. नव्या पिढीमध्ये आधीसारखं लक्षणे कमी बघितली जात आहेत. 

इथे राहणाऱ्या काही लोकांचं म्हणणं आहे की, हे चुकीच्या फेंगशुईमुळे होत आहे. तेच काही लोकांचं म्हणणं आहे की, पूर्वजांचा योग्यप्रकारे दफनविधी न केल्याने असं होत आहे. पण खरं कारण अजूनही लोकांसमोर येत नाहीये. आश्चर्याची बाब म्हणजे इथे परदेशी लोकांना जाण्यास मनाई आहे. 

 

Web Title: A village where only dwarf lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.