प्री-वेडिंग शूट आणि रोमॅंटिक डिनरसाठी बेस्ट डेस्टिनेशन नीमराना किल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 11:14 AM2018-12-28T11:14:29+5:302018-12-28T11:18:09+5:30
दिल्लीजवळ असलेला १५ शतकातील नीमराना किल्ला आजही विकेंड एन्जॉयमेंटसाठी एक बेस्ट डेस्टिनेशन म्हणून लोकप्रिय आहे.
राजस्थानच्या अलवरजवळ असलेला १५ शतकातील नीमराना किल्ला आजही विकेंड एन्जॉयमेंटसाठी एक बेस्ट डेस्टिनेशन म्हणून लोकप्रिय आहे. इथे तुम्ही हॅगिंग्स गार्डन, स्वीमिंग पूल, आयुर्वेदिक स्पा चा आनंद घेऊ शकता. खासकरुन येथील रात्रीचा नजारा बघण्यासाठी लोक मोठी गर्दी करतात. तसेच प्री-वेडींग शूट करण्यासाठी, पार्टनरला सरप्राइज देण्यासाठी आणि रोमॅंटिक डिनरसाठी हे ठिकाण परफेक्ट मानलं जातं.
किल्ल्याची बनावट
हा किल्ला ५५२ वर्ष जुना आहे. १० मजली हा किल्ला अरावली डोंगर कापून ३ एकर परिसरात तयार करण्यात आला आहे. इथे रुम केवळ दिवसा मिळतात. जर तुम्हाला केवळ फिरायला जायचं असेल तर तिकीट घेऊन तुम्ही दोन तास किल्ल्याची सैर करु शकता.
नीमराना किल्ल्याच्या इंटेरिअरमध्ये इंग्रजांची छाप बघायला मिळते. यात ओपन स्वीमिंग पूलही तयार करण्यात आला आहे. नाश्त्यासाठी राजमहल आणि हवामहल, तर जेवणासाठी आमखास, पांच महल, अमलतास, अरण्य महल, होली कुंड आमि महा बुर्ज आहेत. यावरुनच किल्ल्याच्या शाही थाटाचा अंदाज येतो. या किल्लाची खासियत म्हणजे इथे असलेल्या प्रत्येक रुमला वेगळं नाव आहे.
केसरोली
नीमरानापासून काही अंतरावर केसरोली शहर आहे, जे आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखलं जातं. या ठिकाणाबाबत म्हटलं जातं की, पांडवांनी इथे वास्तव्य केलं होतं. इथे हनुमानाची झोपलेली मूर्ती आणि जुने जलाशयही बघायला मिळतात.
कसे जाल
रस्ते मार्गे
दिल्लीहून जयपूर हायवेवर साधारण १२२ किमी प्रवास करुन तुम्ही नीमराणा किल्ल्याला पोहोचू शकता.
रेल्वे मार्ग
येथील जवळील रेल्वे स्टेशन अलवर आहे. जे जवळपास ७० किमी अंतरावर आहे.
विमान मार्गे
इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट येथील सर्वात जवळील एअरपोर्ट आहे. हे येथून १०८ किमी दूर आहे.