काचेचा पूल बघण्यासाठी चीन कशाला, भारतातीलच 'या' शहराला द्या भेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 02:10 PM2020-02-11T14:10:06+5:302020-02-11T14:22:11+5:30

आपण रोज प्रवास करत असताना ज्या ब्रिजचा वापर करत असतो.

Visit uttrakhand place in india for enjoy in glass bridge | काचेचा पूल बघण्यासाठी चीन कशाला, भारतातीलच 'या' शहराला द्या भेट!

काचेचा पूल बघण्यासाठी चीन कशाला, भारतातीलच 'या' शहराला द्या भेट!

googlenewsNext

(image credit- lifeofguangzhou.com)

आपण रोज प्रवास करत असताना ज्या पुलाचा वापर करत असतो. तो पूल वीटा, सिमेंटपासून तयार करण्यात आलेला असतो. भारतातील अनेक लोक  काचेचा पूल पाहण्यासाठी चीनला जातात.  तुम्हालाही जर काचेच्या पुलाचे आकर्षण असेल तर तुम्हाला हा पूल पाहण्यासाठी  चीनला जाण्याची काही गरज नाही. भारतातील उत्तराखंडमध्ये हा पूल तयार केला जाणार आहे. 

उत्तराखंडमधिल पर्यटन स्थळ ऋषिकेश गंगा या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात. या शहरात असलेल्या लक्ष्मण पूल पासून काही अंतरावरच एक नवीन पूल तयार करण्याची योजना आखली जात आहे. ऋषिकेशमधिल लक्ष्मण पूल सुरक्षेच्या कारणास्तव बंद केला होता. त्यानंतर  या पुलाच्या ऐवजी एक नवीन पूल  तयार करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे.

लक्ष्मण पुल हा  ९४ वर्षांपासून या शहाराची ओळख आहे. आता या ठिकाणी एक दुसरा पूल तयार केला जाणार आहे आणि हा पूल काचेचा असणार आहे. काचेवर चालत असताना  पर्यटकांना असं वाटेल की ते नदीवरून प्रवास करत आहेत. हा पूल फार अद्भूत असणार आहे. पर्यटकांचे आकर्षण या पुलाला मिळणार आहे. ( हे पण वाचा-३५० वर्षे अभेद्य राहिलेल्या मुरुड-जंजिरा किल्ल्यामधील हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?)

उत्तराखंडचे मुख्य सचिव ओम प्रकाश यांना गुरूवारी सांगितले की लक्ष्मण पुलासारखाच असलेल्या नवीन पुलाची  रुंदी ८ मीटर आणि लांबी १३२.३ मीटर असेल. यात काचेच्या फरश्या दोन्ही बाजूला असतील. या पुलाची खासीयत अशी आहे की सायकल सारखी हलकी वाहनं या पुलावरून सहजतेने जाऊ शकतील.  पुलासाठी वापरले जात असलेले लोखंडाचे खांब सामान्य मटेरियल पेक्षा जास्त मजबूत असतील. काचेच्या पुलाच्या आजुबाजूला  ७ फिट उंच कठडे असतील. या पुलाला खूप भक्कम बांधकाम करून तयार केलं जाणार आहे. हा पूल कमीतकमी १५० वर्षांपर्यंत व्यवस्थित राहील. (  हे पण वाचा-आता रेल्वे प्रवासात बिनधास्त झोपा, तुमचं स्टेशन आल्यावर तुम्हाला झोपेतून उठवलं जाईल...)

Web Title: Visit uttrakhand place in india for enjoy in glass bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.