रस्त्यावर असेलल्या पांढऱ्या-पिवळ्या रेषांचा काय असतो अर्थ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 01:18 PM2018-07-25T13:18:57+5:302018-07-25T13:27:29+5:30
रस्त्यावरून चालताना आपल्याला पांढऱ्या आणि पिवळ्या अनेक रेषा आखलेल्या दिसतात. पण कधी विचार केलाय या रेषा नक्की कशासाठी असतात? किंवा या रेषांचा अर्थ काय होतो? या रेषा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आखलेल्या असतात.
रस्त्यावरून चालताना आपल्याला पांढऱ्या आणि पिवळ्या अनेक रेषा आखलेल्या दिसतात. पण कधी विचार केलाय या रेषा नक्की कशासाठी असतात? किंवा या रेषांचा अर्थ काय होतो? या रेषा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आखलेल्या असतात. परंतु, आपल्यापैकी क्वचितच कोणाला माहीत असेल. ट्रॅफिकबाबतचे नियम जाणून घेताना फक्त ट्रॅफिक सिग्नल्स आणि ट्रॅफिकचे साईन बोर्ड जाणून घेणं इतकचं नाही, तर या रेषांचे अर्थ जाणून घेणंही ट्रॅफिकच्या नियमांचाच एक भाग आहे. जे प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं असते.
सॉलिड व्हाइट लाइन -
या रेषेचा अर्थ होतो की, तुम्ही ज्या लेनमधून गाडी चालवताय ती लेन तुम्हाला बदलायची नाहीये. ज्या लेनमध्ये गाडी चालवताय, त्याच लेनवर गाडी चालवत रहा, असा त्याचा अर्थ होतो.
ब्रोकन व्हाइट लाइन -
या लाईनचा असा अर्थ होतो की, तुम्ही सावध राहून तुमची लेन बदलू शकता. पण असं करत असताना तुमच्या सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं असतं. तुमच्या आजूबाजूने येणाऱ्या गाड्यांचा अंदाज घेऊन लेन बदलणं आवश्यक असतं.
एक सॉलिड यलो लाइन -
या लाईनचा अर्थ असा असतो की, तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या गाड्यांना ओव्हरटेक करू शकता. परंतु, पिवळी लाईन पार करू नका. हे नियम प्रत्येक राज्यांनुसार बदलतात. उदाहरण म्हणून सांगायचे झाले तर तेलंगणामध्ये पिवळ्या लाईनचा अर्थ असा होतो की, तुम्ही ओव्हटेक करू शकत नाही.
दो सॉलिड यलो लाइन -
गाडी चालवताना या लाईन तुम्ही पार करू शकत नाहीत. तुम्हाला या लाईनच्या आत राहूनच गाडी चालवणं गरजेचं असतं.
ब्रोकन यलो लाइन -
या रेषेवर गाडी चालवताना तुम्ही लाईनवर गाडी चालवू शकता पण सावधानतेने गाडी चालवणं गरजेचं असतं.
सॉलिड यलो लाइनसोबत ब्रोकन यलो लाइन -
जर तुम्ही ब्रोकन लाईनच्या बाजूने गाडी चालवत असाल तर तुम्ही ओव्हरटेक करू शकता. परंतु, तुम्ही सॉलिड लाईनच्या बाजूने गाडी चालवत असाल तर ओव्हरटेक करू शकत नाही.