Women's Day Special : मैं अलबेली, घुमी अकेली... जगभर एकटं फिरून ब्लॉग लिहिणाऱ्या पंचकन्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 03:21 PM2019-03-08T15:21:43+5:302019-03-08T15:34:28+5:30
आज 8 मार्च जागतिक महिला दिन.... सध्याचा काळ बदलला असून महिलांनी चौकट मोडून चौकटीबाहेरील आयुष्य जगण्यास सुरुवात केली आहे.
आज 8 मार्च जागतिक महिला दिन.... सध्याचा काळ बदलला असून महिलांनी चौकट मोडून चौकटीबाहेरील आयुष्य जगण्यास सुरुवात केली आहे. घरातून बाहेर पडणं, एकटीने प्रवास करणं काही वर्षांपूर्वी महिलांसाठी अशक्य गोष्ट होती असं मानलं जायचं. पण सध्या ती फक्त खुलून बोलू शकतच नाही तर आपली एकटं फिरण्याची हौसही पूर्ण करताना दिसते. आज आंतराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया अशा काही महिलांबाबत ज्यांनी संपूर्ण जगभ्रमंती एकट्याने करण्याचा निश्चय करून अनेक महिलांना त्या इन्स्पायर करतात. यांच्यामुळेच सोलो ट्रॅव्हलिंगचाही ट्रेंड पॉप्युलर झाला आहे.
शिव्या नाथ
ट्रॅव्हल ब्लॉगरच्या लिस्टमध्ये शिव्या नाथचं नाव टॉपवर आहे. ज्यांनी 23 व्या वर्षी आपला 9 ते 5चा जॉब सोडून आपल्या फिरण्याचा छंद जोपासला आणि आज याचमुळे जगभरामध्ये तिची वेगळी ओळख तयार झाली आहे. शिव्याने महिलांबाबतच्या सर्व चौकटी मोडून एकट्याने ट्रॅव्हलिंग करण्यासाठी अनेक महिलांना इन्स्पायर केलं आहे. शिव्याच्या या धाडसाला अनेक मीडिया ऑर्गनायझेशन्स आणि मॅगझिन्सनी सलाम केला आहे. तिच्या ब्लॉग आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक्सप्लोअर केलेल्या जागांबाबत माहिती आणि फोटो पाहू शकता.
लक्ष्मी शरथ
ट्रॅव्हल ब्लॉगरच्या लिस्टमध्ये दुसरं फेमस नाव म्हणजे, लक्ष्मी शरथ. ब्लॉगर बनण्याआधी लक्ष्मी रायटर, फोटोग्राफर आणि मीडिया यांसारख्या क्षेत्रांमध्ये काम करत होती. परंतु, 15 वर्ष काम केल्यानंतरही तिला असं वाटलं की, तिचं खरं स्वप्न बसून काम करणं नाही तर जग फिरणं आहे. मनाशी ठरवलं आणि निघाली आयुष्याचा वेगळा प्रवास करण्यासाठी. आतापर्यंत तिने 25 देशांची सफर केली असून तिच्या ब्लॉगवर पाहू शकता.
अनुराधा गोयल
कॉरपोरेटचा मस्त आणि चांगला जॉब सोडून अनुराधा यांनी आपली आवड जोपासण्यासाठी ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणून वेगवेगळी ठिकाणं फिरण्यास सुरूवात केली. 12 वर्षांचा आयटी फिल्ड एक्सपीरियंस घेतल्यानंतर आता ट्रॅव्हलिंगसाठी महिलांना इन्स्पायर करण्याचं काम करतात. त्यांचा हा प्रवास तुम्ही त्यांच्या ब्लॉगवर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर पाहू शकता. यांनी आतापर्यंत 15 देशांची सफर केली आहे.
रुतवी मेहता
7 वर्ष हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर रूतवीला वाटलं की, कदाचित हे आपलं क्षेत्र नाही. मग नोकरीला रामराम करून ती बॅग घेऊन निघाली यूरोप टूरवर. तिने उचललेल्या या पावलामुळए तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. त्यानंतर एकट्याने केलेल्या प्रवासाने फक्त रूतवीलाच हिंमत दिली नाही तर अनेक महिलांना प्रवासासाठी इन्पायर केले. अॅडवेंचर्सची आवड असणाऱ्या रूतवीने एवरेस्ट बेस कॅम्पचाही ट्रेक केला आहे. फिरण्यासोबतच ती लदाखमध्ये 2 वर्षांच्या मुलांना शिकवण्याचंही काम करते.
मृदुला दिवेदी
मृदुला दिनेदीचा ट्रॅवलिंग एक्सपिरियंस या सर्वांपेक्षा जास्त आहे कारण त्या वयाच्या 18व्या वर्षांपासून काम करत आहे. ठिकठिकाणी फिरणं, तेथील गोष्टी आणि आपला अनुभव लोकांपर्यंत पोहोचवणं तिचं आवडीचं काम आहे. आयआयटी कानपूरमधून पीएचडी केल्यानंतर त्यांनी प्रोफेसर म्हणून नोकरी केली. ज्यानंतर आपली ट्रॅव्हलिंगची आवड जोपासण्यासाठी त्यांनी तो जॉब सोडून दिला. आतापर्यंत मृदुलाने 26 देशांची सफर केली आहे.