चीनमध्ये सुरु झालं जगातलं पहिलं फाईव्ह स्टार अंडरग्राउंड हॉटेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 01:58 PM2018-11-22T13:58:16+5:302018-11-22T13:59:56+5:30

चीनमध्ये परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना सतत लढवल्या जात आहे. आता चीनच्या शांघायमधील सोंगजियांग क्षेत्राच एक असं हॉटेल उभारण्यात आलंय, जे जमिनीखाली आहे.

Worlds first underground hotel opens in China | चीनमध्ये सुरु झालं जगातलं पहिलं फाईव्ह स्टार अंडरग्राउंड हॉटेल!

चीनमध्ये सुरु झालं जगातलं पहिलं फाईव्ह स्टार अंडरग्राउंड हॉटेल!

(Image Credit : The Independent)

चीनमध्ये परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना सतत लढवल्या जात आहे. आता चीनच्या शांघायमधील सोंगजियांग क्षेत्राच एक असं हॉटेल उभारण्यात आलंय, जे जमिनीखाली आहे. जवळपास १२ वर्षांच्या मेहनतीनंतर तयार झालेलं हे हॉटेल आता लोकांसाठी खुलं करण्यात आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, चीनमधील हे हॉटेल जगातलं जमिनीखाली असलेलं पहिलं हॉटेल आहे. हे एक १८ मजल्यांचं हॉटेल असून याचे जास्तीत जास्त मजले हे जमिनीखाली आहेत. शांघायचं हे हॉटेल तयार करण्यासाठी ५ हजार आर्किटेक्ट, इंजिनिअर आणि कामगारांना एकत्र यावं लागलं. आणि हे हॉटेल उभं करण्यासाठी साधारण २ हजार कोटी रुपये खर्च आला आहे.

८८ मीटर खोलीत असलेल्या या इंटरकॉन्टिनेन्टल शांघाय वंडरलॅंड हॉटेलला शिमाओ क्वॅरी हॉटेल नावानेही ओळखले जाईल. या हॉटेलच्या सर्वात महागड्या रुममध्ये थांबण्याचा एका रात्रीचा खर्च साधारण १४ हजार डॉलर सांगितला जात आहे. ही रक्कम भारतीय चलनात ९९८६९० इतकी होते.

या हॉटेलचं डिझाइन ब्रिटिश आर्किटेक्ट मार्टिन जोकमॅन यांनी डिझाइन केलं आहे. हॉटेलचं निर्माण ज्या जागी झालंय, तिथे एक खोल खड्डा होता. त्यात हे हॉटेल उभारण्यात आलं आहे. या हॉटेलचे पहिले दोन मजलेच जमिनीच्या वर आहेत. तर सर्वात खालचे दोन मजले पूर्णपणे तलावात बुडालेले आहेत. यात राहणाऱ्या लोकांना फाइव्ह स्टार सुविधा दिल्या जाणार आहेत.

या हॉटेलमध्ये एकूण ३३६ खोल्या आहेत. तसेच इथे रॉक क्यायंबिंग आणि बंजी जंपिंगसहीत अनेक अॅडव्हेंचरस गोष्टी करायची सुविधा करण्यात आली आहे.
 

Web Title: Worlds first underground hotel opens in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.