केवळ दगडांनी तयार केलेला राजस्थानचा दुसरा सर्वात मोठा सोनारगढ किल्ला! 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 12:48 PM2018-12-19T12:48:22+5:302018-12-19T12:51:21+5:30

भारताच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आजही कित्येक ऐतिहासिक किल्ले चांगल्या अवस्थेत आढलतात. राजस्थानमधील तर कित्येक किल्ले जगभरात प्रसिद्ध आहेत.

Worth visit to Sonar Fort in Jaisalmer, Rajasthan | केवळ दगडांनी तयार केलेला राजस्थानचा दुसरा सर्वात मोठा सोनारगढ किल्ला! 

केवळ दगडांनी तयार केलेला राजस्थानचा दुसरा सर्वात मोठा सोनारगढ किल्ला! 

googlenewsNext

भारताच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आजही कित्येक ऐतिहासिक किल्ले चांगल्या अवस्थेत आढलतात. राजस्थानमधील तर कित्येक किल्ले जगभरात प्रसिद्ध आहेत. असाच एक किल्ला म्हणजे जैसलमेरचा सोनारगढ किल्ला. सध्याचं वातावरण या किल्ल्याला भेट देण्याचा सर्वात परफेक्ट वातावरण आहे. चला जाणून घेऊ या किल्ल्याच्या खासियतबाबत...

सोनारगढ हा किल्ला जैसलमेरची शान मानला जातो. पिवळ्या दगडांनी तयार करण्यात आलेल्या या किल्ल्यावर जेव्हा सर्यकिरणे पडतात तेव्हा हा किल्ला सोन्यासारखा चमकतो. त्यामुळे या किल्ल्याला सोनार किल्ला असं नाव पडलं आहे. आपल्या बनावटीमुळे आणि सुंदरतेमुळे या किल्ल्याचा यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइटच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. हा किल्ला राजस्थानमधील दुसरा सर्वात मोठा किल्ला आहे. थार वाळवंटाच्या मधोमध त्रिकुटा डोंगरावर हा किल्ला आहे. 

सोनार किल्लाची बनावट

विशाल पिवळ्या दगडांनी तयार केलेला सोनार किल्ला बघायला जितका सुंदर आहे तितकं त्याचं निर्माण रोचक आहे. चूना आणि चिखलाचा अजिबात वापर न करता उभारलेला हा किल्ला सर्वांनाच चकीत करणारा आहे. १५०० फूट लांब आणि ७५० फूट रुंद हा किल्ला आहे. किल्ल्याच्या चारही बाजूने ९९ गड तयार करण्यात आले आहेत. ज्यातील ९२ गडांचं निर्माण १६३३ ते १६४७ दरम्यान करण्यात आलंय. या किल्ल्याचं तळघर हे १५ फूट लांब आहे. या किल्ल्याचं पहिलं आकर्षण या किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. ज्यावर सुंदर नक्षीकाम करण्यात आलंय.

जैन मंदिर आहे खास

गोल्डन फोर्टमध्ये काही जैन मंदिरे आहेत. ही मंदिरे त्यांच्या अतिसुंदर कलाकृतींमुळे ओळखली जातात. हे मंदिरावर पांढऱ्या आणि पिवळ्या दगडांवर नक्षीकाम करुन तयार करण्यात आलं आहे. 

म्यूझिअम आणि प्राचीन वारसा

जैसलमेरचा किल्ला हा तेथील राजांचं निवासस्थान होता. आता यात संग्रहालय आणि वारसा केंद्र तयार करण्यात आलं आहे. त्या काळातील अनेक वस्तू आणि कलाकृती यात ठेवण्यात आल्या आहेत. तसेच वेगवेगळ्या युद्धांमध्ये वापरण्यात आलेली लोकप्रिय तोफही इथे बघण्यासाठी ठेवण्यात आली आहे.

कधी जाल?

ऑक्टोबर ते मार्चपर्यंत जैसलमेर फिरण्यासाठी परफेक्ट कालावधी असतो. या काळात तुम्ही इथे वेगवेगळ्या गोष्टी एन्जॉय करु शकता.

कसे पोहोचाल?

विमान मार्गे - जैसलमेर मिलिट्री एअरपोर्टमुळे केवळ चार्टर फ्लाइट्सचीच वाहतूक असते. त्यामुळे इथे उतरुन तुम्ही २८५ किमी प्रवास करुन रस्त्याने जैसलमेरला पोहोचू शकता. 

रेल्वे मार्ग - जैसलमेर येथील सर्वात जवळील रेल्वे स्टेशन आहे. फेमस टूरिस्ट स्पॉट असल्याने येथून तुम्हाल टॅक्सी आणि ऑटो सहज मिळतात. 

रस्ते मार्गे - जैसलमेर शहर हे जोधपूर, जयपूर, बीकानेर, बाडमेर, माउंट आबू, जालोर आणि अहमदाबाद हायवेसोबत जोडलं आहे.

Web Title: Worth visit to Sonar Fort in Jaisalmer, Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.