खुशखबर! आता केवळ 13 हजार 500 रुपयात करु शकाल दिल्ली ते न्यूयॉर्क प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 12:31 PM2018-05-17T12:31:45+5:302018-05-17T12:31:45+5:30

आता परदेशात फिरायला जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही भारत ते अमेरिका प्रवास केवळ

Wow Air offering cheapest airfare to NewYork from Delhi | खुशखबर! आता केवळ 13 हजार 500 रुपयात करु शकाल दिल्ली ते न्यूयॉर्क प्रवास

खुशखबर! आता केवळ 13 हजार 500 रुपयात करु शकाल दिल्ली ते न्यूयॉर्क प्रवास

googlenewsNext

नवी दिल्ली : उन्हाळ्याची सुट्टी असो वा अधेमधे आलेल्या सुट्या अनेकांना परदेशात फिरायला जाण्याची इच्छा असते. पण विमानाच्या तिकीटाचे दर पाहूनच अनेकांना आपला प्लॅन कॅन्सल करावा लागतो. पण आता परदेशात फिरायला जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही भारत ते अमेरिका प्रवास केवळ 13, 499 रुपयांमध्ये करु शकणार आहात. तर अमेरिका ते भारत राऊंड ट्रिपसाठी तुम्हाला 27, 000 रुपये मोजावे लागतील. आणि ही ऑफर आयरलंडची एअरलाईन्स वॉव एअर देत आहे. 

कधी सुरु होणार सेवा?

कंपनीने घोषणा केली आहे की, दिल्ली ते रेकजाविकची फ्लाइट 7 डिसेंबरपासून सुरु केली जाईल. या एअरलाईन्सचे सीईओ स्कूली मोगेनसन यांच्यानुसार, दिल्लीहून रेकजाविकची फ्लाईट आणि त्यापुढे न्यूयॉर्क, सॅन फ्रॅन्सिस्को आणि लॉस एजंलिसच्या फ्लाइटचं खर्च 13, 499 रुपये असेल. त्यांनी सांगितले की, जेवण, चेक इन बॅग्स आणि हव्या त्या सीटसाठी वेगळे पैसे द्यावे लागतील. बेसिक प्राईजमध्ये आम्ही ग्राहकांना एक सीट आणि लॅपटॉप बॅकसारखी सुविधा देत आहोत. कंपनी बिझनेस क्लाससाठी 46,559 इकते भाडे वसूल करणार आहे. 

आठवड्यातून किती फ्लाइट?

दिल्लीहून रेकजाविकची फ्लाइट आठवड्यातून 5 वेळा असणार आहे. ही सेवा इतर शहरातूनही सुरु करण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे. 
वॉव एअर भारतात ए-330 विमानाने सेवा देते.  तर ही कंपनी यूरोप आणि उत्तर अमेरिकेत 39 जागांवर फ्लाइट सेवा देते. यात शिकागो, टोरांटो, लंडन आणि पॅरिससारख्या जागाही आहेत. 

2025 पर्यंत यूकेला मागे टाकणार भारत

इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशननुसार, यूकेला मागे टाकत भारत 2025 पर्यंत 27 कोटी 80 लाख प्रवाशी असलेला तिसरा सर्वात मोठं एअरलाईन्स मार्केट बनेल.

Web Title: Wow Air offering cheapest airfare to NewYork from Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.