उन्हाळ्यात पैसा वसूल ट्रिपसाठी आवर्जून भेट द्या येरकाडला, जाणून घ्या खासियत!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 11:58 AM2019-04-16T11:58:25+5:302019-04-16T12:10:06+5:30
उन्हाळा आता चांगलाच पेटला आहे. अशात शाळा-कॉलेजांनाही काही दिवसात सुट्टी लागले. मग फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत काही दिवस कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅनही सुरु होईल.
उन्हाळा आता चांगलाच पेटला आहे. अशात शाळा-कॉलेजांनाही काही दिवसात सुट्टी लागले. मग फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत काही दिवस कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅनही सुरु होईल. तशी तर भारतात फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. पण नुसतं फिरुन येण्यापेक्षा ही ट्रिप नेहमीसाठी स्मरणात कशी राहील हेही महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही फिरायला कुठे जाणार ते ठिकाण महत्त्वाचं आहे. अशाच एका ठिकाणाची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे ठिकाण आहे तामिळनाडूतीच्या सेलम जिल्ह्यातील 'येरकाड'. उन्हाळ्यात निसर्गाला फार जवळून पाहण्याचा येथील तुमचा अनुभव नेहमीसाठी लक्षात राहील.
येरकाड लेक
येरकाड लेकला बिग लेक नावानेही ओळखले जाते. हे शहराच्या मधोमध आहे. चारही बाजूने पसरलेल्या हिरवळीमुळे लेकचं सौंदर्य अधिक वाढतं. त्यासोबतच इथे तुम्ही बोटींगही करु शकता. खास बाब ही आहे की, येथील थंड हवा तुम्हाला काही मिनिटात रिफ्रेश करेल. लेकच्य मधोमध एक द्वीप आहे ज्याला ओवरब्रिजशी जोडलं गेलं आहे. या द्वीपावर हरण आणि मोर बघितले जाऊ शकतात.
पगोडा पॉइंट
(Image Credit : Goibibo)
येरकाड आल्यावर पगोडा पॉइंट पाहिल्या नाही तर ही ट्रिप अधुरी राहू शकते. या पॉइंटहून तुम्ही संपूर्ण शहराचा मनमोहक नजारा बघू शकता. या पगोडा नाव पडलं कारण इथे दगडापासून तयार अशी संरचना आहे जी बघायला पगोडासारखी दिसते.
शेवाराय मंदिर आणि भालूची गुहा
सर्वरायन डोंगरावर समुद्र सपाटीपासून ५३२६ फूच उंचीवर हे शेवाराय मंदिर आहे. हे ठिकाण येरकाडमधील सर्वात उंच ठिकाण आहे. हे मंदिर स्थानिक देवता सरवरन आणि त्यांची पत्नी कवरिअम्मा यांना समर्पित आहे. इथे राहणारे लोक दरवर्षी मे महिन्यात उत्सव साजरा करता. तसेत इथे भालूच्या गुहेबद्दल म्हटलं जातं की, १८व्या शतकात महाराजा टीपू सुलतानच्या गुप्त ठिकाणांपैकी एक हे ठिकाण होतं.
लेडीज सीट
(Image Credit : TripAdvisor)
हे ठिकाण ब्रिटीश काळातील आहे. इंग्रज शासकांच्या पत्नी या ठिकाणाचा वापर त्यांच्या किटी पार्टीसाठी करत होत्या. येथून सूर्यास्ताचा फार सुंदर नजारा बघायला मिळतो. तसेच येथून एका टेलिस्कोपच्या माध्यमातून मैदानी परिसराला जवळून पाहता येतं.
सिल्क फॉर्म अॅन्ड रोज गार्डन
हे ठिकाण लेडीज सीटच्या जवळच आहे. इथे तुम्ही येरकाडमधील पारंपारिक कला बघू शकता. तसेच सिल्क वॉर्म म्हणजे रेशम कापड कशाप्रकारे तयार केला जातो हेही बघू शकता. तसेच येथील गुलाबाचं गार्डनही लोकप्रिय आहे.
कसे पोहोचाल?
येरकाडपासून सर्वात जवळ तिरुचिरापल्ली हे विमानतळ आहे. त्यासोबतच कोयंबटूर आणि बंगळुरु विमानतळाहूनही इथे पोहोचता येतं. तसेच येथील मुख्य रेल्वे स्टेशन सेलम आहे. हे रेल्वे स्टेशन ३१ किमी अंतरावर आहे.