असा आहे निसर्गरम्य अरुणाचल प्रदेश; उगवत्या सूर्याच्या राज्यात जाणं आता झालं सोपं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 02:56 PM2019-02-01T14:56:26+5:302019-02-01T14:58:04+5:30

भारतातील उगवत्या सूर्याचं राज्य म्हणून ओळखलं जाणारं अरुणाचल प्रदेश आपल्या निसर्गसौंदर्यासाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. लवकरच अरूणाचल प्रदेशमध्ये आणखी एक विमानतळ तयार होणार आहे.

You can soon fly to Arunachal Pradeshs itanagar as soon there will be a new airport | असा आहे निसर्गरम्य अरुणाचल प्रदेश; उगवत्या सूर्याच्या राज्यात जाणं आता झालं सोपं

असा आहे निसर्गरम्य अरुणाचल प्रदेश; उगवत्या सूर्याच्या राज्यात जाणं आता झालं सोपं

googlenewsNext

भारतातील उगवत्या सूर्याचं राज्य म्हणून ओळखलं जाणारं अरुणाचल प्रदेश आपल्या निसर्गसौंदर्यासाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. लवकरच अरूणाचल प्रदेशमध्ये आणखी एक विमानतळ तयार होणार आहे. या नव्या विमानतळामुळे उत्तर भारतातील पर्यटनामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या एअरपोर्टचं नाव होलोंगी असणार आहे. काही दिवसांपूर्वीच शासनाने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे विमानतळ अरुणाचल प्रेदशची राजधानी ईटानगरमध्ये तयार करण्यात येणार आहे. 

इटानगरपासून हे विमानतळ जवळपास 25 किलोमीटर अंतरावर आहे. ज्याचा रनवे जवळपास 2200 मीटर असणार आहे. असं म्हटलं जात आहे की, हे एअरपोर्ट सुरू झाल्यानंतर येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे. देशाच्या इतर राज्यांसोबतच विदेशी पर्यटक अगदी सहज अरूणाचल प्रदेशलाही पोहचू शकतात. 

ईटानगरमधील टूरिस्ट स्पॉट

जर तुम्ही उत्तर भारतातील राज्यांचे सौंदर्य अनुभवण्यासाठी आतुर असाल तर तुम्हाला अरूणचल प्रदेशमधील काही ठिकाणांबाबत माहीत असणं आवश्यक आहे. तसं पाहायला गेलं तर अरूणाचलची राजधानी ईटानगरमध्येच फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत.

तुम्ही ईटानगरला फिरण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर गोंपा मंदिर, ईटा फोर्ट, गंगा झील, रूपा, ईटानगर वन्यजीव अभयारण्य आणि नामधापा नॅशनल पार्कमध्ये नक्की जा. 

ईटा फोर्ट 

ईटा फोर्ट ईटानगरच्या मध्यावर वसलेला आहे. या किल्ल्याच्या नावावरूनच या शहराचे नाव ईटानगर ठेवण्यात आले आहे. या किल्यामध्ये या शहराचा इतिहासही दडलेला आहे. साधारणतः 14व्या किंवा 15व्या शतकामध्ये हा किल्ला तयार करण्यात आला असून त्यासाठी सामान्य विटांपेक्षआ मोठ्या विटांचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे या किल्लाचे नाव ईटा फोर्ट असं ठेवण्यात आलं आणि या किल्लामुळे शहराचं नाव ठेवण्यात आलं. असं म्हटलं जातं की, किल्ला तयार करण्यासाठी 80 लाखांपेक्षा अधिक विटांचा वापर करण्यात आला होता. 

गंगा झील 

अरुणाचल प्रदेशमध्ये असलेल्या प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये गंगा झीलचाही समावेश होतो. या शहरातील स्थानिक भाषेमध्ये या तलावाला गेकर सिन्यी असं म्हटलं जातं. हा तलाव शहरापासून जवळपास 6 किलोमीटर अंतरावर आहे. खास गोष्ट म्हणजे, ऋतू कोणताही असो येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कधीच कमी होत नाही. या तलावाच्या चारही बाजूंना घनदाट जंगल आहे. त्यामुळे या तलावाच्या सौंदर्यात आणखी भर पडते. या तलाबाबत अनेक पौराणिक कथाही सांगितल्या जातात. 

रूपा

रूपा अरूणाचल प्रदेशमधील छोटंसं पण आकर्षक हिल स्टेशन आहे. हे हिल स्टेशन तेंगा नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या हिम श्रृंखलेवर स्थित आहे. येथील विंहगमय दृश्य आणि या हिल स्टेशनचं सौंदर्य येथे येणाऱ्या पर्यटकांचं मन अगदी तृप्त करतात. 

Web Title: You can soon fly to Arunachal Pradeshs itanagar as soon there will be a new airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.