495 हेच उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 04:47 PM2020-05-29T16:47:02+5:302020-05-29T16:47:02+5:30

कापरेकर स्थिरांक म्हणजे काय, याचं आणखी एक उदाहरण

495 kaprekar digit | 495 हेच उत्तर

495 हेच उत्तर

Next
ठळक मुद्देघराला बनवा तुमची प्रयोगशाळा


साहित्य 
 कागद, पेन किंवा पेन्सिल.
कृती 
1.  एक तीन अंकी संख्या घ्या. अट एकच तीनही अंक एक सारखे नकोत. शून्य असले तरी चालेल. एक अंक दोनदा असला तरी चालेल.
2.  या तीन अंकी संख्येतले अंक उतरत्या क्रमाने लावा ती संख्या कागदावर लिहा.
3.  हेच तीन अंक चढत्या क्रमाने लावा आणि ही संख्या आधीच्या संख्येतून वजा करा. 
4. वजाबाकी तीन अंकी येईल. ही तीन अंकी संख्या घेऊन त्यातले तीन अंक उतरत्या क्रमाने लावा ती संख्या कागदावर लिहा. 
5. हेच तीन अंक चढत्या क्रमाने लावा आणि ही संख्या आधीच्या संख्येतून वजा करा. 
6. असे करत करत एक वेळ अशी येईल की तुम्हाला 495 हेच उत्तर मिळेल.
- 495 या क्रमांकाला कापरेकर स्थिरांक म्हणतात.
 

Web Title: 495 kaprekar digit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.