भूक लागली ? हा घ्या सोपा खाऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 12:08 PM2020-06-12T12:08:22+5:302020-06-12T12:09:19+5:30
संध्याकाळी भूक लागते तेव्हा तुम्ही स्वत:च करू शकाल असा खाऊ
तुम्हाला मिक्सर वापरता येतो का? येत नसेल तर शिकून घ्या, त्यात काही विशेष कठीण नसतं. आणि सगळ्यांसाठी मस्त स्मूदीज तयार करा.
साहित्य: एका ग्लाससाठी 1 केळं, अर्धाकप दूध, 2 चमचे साखर, 2 थेंब व्हॅनिला इसेन्स (घरात असल्यास) आणि चिमूटभर दालचिनी पावडर
कृती:
1) केळ्याचे बारीक तुकडे करा आणि मिक्सरच्या भांड्यात टाका.
2) त्यात दूध, साखर, व्हॅनिला इसेन्स आणि दालचिनी पावडर घाला. चांगलं फिरवून घ्या.
3) आता एक ग्लास घेऊन त्यात हा तुमचा बनाना स्मूदी ओता. दूध थंड असेल तर तुम्ही लगेच पिऊ शकता. थंड नसेल तर पाच दहा मिनिटं फ्रिजमध्ये ठेवूनही मग पिता येईल.
4) तुम्हाला आवडत असेल आणि घरात असेल तर यात दुसरीही फळं वापरता येतील.
5) जसं की चिक्कू आणि केळं एकत्र. किंवा खजूर आदल्या दिवशी भिजत घालून तेही या स्मूदीत घालता येतील.
.