हा कोल ब्लॅकवाय भारी आहे, तो काय आणि का म्हणतोय, नीट ऐका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 10:25 PM2020-04-10T22:25:58+5:302020-04-10T22:27:17+5:30
आपणही सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत, आपल्या सगळ्यांचा आवडीनिवडी वेगळ्या आहेत. मग अशावेळी एकमेकांना नावं ठेवण्यापेक्षा या वेगळेपणाचा आनंद घेतला तर?
कोल काय सांगतोय बघा.
आपण सगळे दिसायला सारखेच आहोत का? आपल्या त्वचेचा रंग, आपले नाकडोळे, आपली उंची, आपली भाषा, आपल्या घरातले सणवार, आपण जे अन्न खातो ते. सगळं सगळ्यांचं सेम टू सेम आहे का?
म्हणजे विचार करा हा, समजा आपण सगळे दिसायला सारखेच असतो, आपल्या सगळ्यांना सगळं सेम सेम येत असतं, आपण आपल्या कुठल्याही मित्रमैत्रिणींच्या घरी गेलो तरी सेम आपल्या घरच्याच चवीचं जेवण असेल, म्हणजे अगदी हॉटेलात गेलो तरीही, तर आपल्याला मजा आली असती का?
बहुदा, खूपच बोअर झालं असतं.
सगळं काय सेम टू सेम?
आपण सगळे एकमेकांपासून कितीतरी वेगळे आहोत हे किती भारी आहे. म्हणूनच आपल्या देशाच्या प्रति™ोतही म्हटलं आहे, विविधतेने नटलेल्या माणसांमधली ही विविधता किती छान आहे ना?
हेच सांगतोय कोल ब्लॅकवाय. तो म्हणतो आपण सगळे वेगळे आहोत आणि तेच सगळ्यात बेस्ट आहे. कोलचा एक मित्र आहे, जो 44 वर्षांचा आहे. त्याला ऑटिझम झाला आहे. कोलच्या आईच्या शाळेतला तो तिचा मित्र आता कोलचाही मित्र आहे. कोल म्हणतो, स्टीव्ह वेगळा आहे, पण तो वेगळा आहे हेच किती छान आहे.
आपणही सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत, आपल्या सगळ्यांचा आवडीनिवडी वेगळ्या आहेत. मग अशावेळी एकमेकांना नावं ठेवण्यापेक्षा या वेगळेपणाचा आनंद घेतला तर? ते एन्जॉय केलं तर? कित्ती मज्जा येईल.
तुम्हाला ऐकायचंय कोल काय म्हणतोय?
मग गुगलवर जा.
Ted talk cole blakeway हे शब्द इंग्रजीत टाईप करा आणि त्याचा व्हिडीओ बघा.