बाबांना आता अर्धाच पगार मिळणार, त्यांना टेंशन आलं असेल  का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 07:01 PM2020-05-14T19:01:21+5:302020-05-14T19:02:25+5:30

समीरचे बाबा सध्या कामावर जात नाहीयेत, त्यामुळे आता त्यांना निम्माच पगार मिळेल.. मग काय होईल?

corona lockdown- jobloss, salary cut- parents in trouble - what to do? | बाबांना आता अर्धाच पगार मिळणार, त्यांना टेंशन आलं असेल  का ?

बाबांना आता अर्धाच पगार मिळणार, त्यांना टेंशन आलं असेल  का ?

googlenewsNext
ठळक मुद्देबाबांना टेन्शन आलं असेल का?


सध्या लॉकडाऊन सुरु आहे ना, त्यामुळे माझे  बाबा कामावर जात नाहीयेत तर त्यांना या महिन्यात निम्माच पगार मिळणार असं आई म्हणत होती ते मी ऐकलं.. माझ्या  बाबांना टेन्शन आलं असेल का?
- समीर

समीर, आपण आता कोरोनाशी लढाई करतो आहोत, पण आपली लढाई खरंतर फक्त कोरोनाशी नाहीये हे तुम्ही मुलांनीही समजून घेणं आवश्यक आहे. 
म्हणजे बघा हं, कोरोनामुळे सगळे कामधंदे बंद आहेत. माणसे घरात आहेत. अशात पैशांचे चलनवलनही पूर्णपणो बंद झाले आहे. गरजेपुरत्या जीवनावश्यक वस्तूंचीच फक्त खरेदी विक्री सुरु आहे. सगळे कारखाने बंद आहेत, निरनिराळ्या सेवा पुरवणारी ऑफिसेस बंद आहेत. त्यामुळे विक्री नाहीये. विक्री नाही म्हणून पैसे नाहीत. आणि जर कारखाने, कंपन्या, ऑफिसेस यांच्याकडे पैसेच येत नसतील तर ते त्यांच्याकडे काम करणा?्या लोकांना पगार कसा देणार? पण पगार तर दिलाच पाहिजे ना, म्हणून मग त्यातून एक मार्ग काढलेला आहे. अनेक कंपन्या, ऑफिसेस त्यांच्या कर्मचा?्यांना निम्माच पगार देणार आहेत, जेणोकरून पुढचे दोन तीन महिने काम सुरु झालं नाही तरीही सगळ्याना थोडे थोडे पैसे देता येतील आणि कुणीच अडचणीत येणार नाही. अनेक कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर काम करणा?्या व्यक्ती स्वत:हून निम्माच पगार घेत आहेत कारण त्यांच्या कंपनीत काम करणा?्या सगळ्या लोकांना त्यांचे पगार वेळेवर मिळावेत म्हणून!


हा काळ कठीण आहे मुलांनो, निम्मा पगार मिळणार म्हणून बाबांना थोडं टेन्शन आलेलं असू शकतं. पण त्याची काळजी तुम्हा मुलांनी करायची गरज नाही. आईबाबा समर्थ असतात असे प्रश्न सोडवण्यासाठी. मुळात आता आपले खर्च कमी आहेत. उद्या लॉक डाऊन संपल्यावरही आपल्याला आपले खर्च कमीच ठेवावे लागणार आहेत. तरच आहे त्या परिस्थितीत आपण व्यवस्थित राहू शकू. त्यामुळे नको त्या गोष्टींसाठी हट्ट करायचे नाहीत ही आता तुम्हा मुलांचीही जबाबदरी आहेच. कितीही अवघड समस्या असली तरी आपण सगळ्यांनी मिळून प्रय} केले तर त्यातून नक्कीच मार्ग निघू शकतात. काळजी करायची नाही, सगळं ठीक होणार आहे.


 

Web Title: corona lockdown- jobloss, salary cut- parents in trouble - what to do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.