आता शाळा ऑनलाईन होणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 07:10 AM2020-05-12T07:10:00+5:302020-05-12T07:10:02+5:30
पण हे कसं शक्य आहे? शाळेत जायचंच नाही म्हणजे काय?
मी असं वाचलं की आता शाळा ऑनलाईनच होणार बहुतेक. असं कसं शक्य आहे? - मधुरा सैंदाणे , औणोरंगाबाद
मधुरा, सध्या आपण तिसऱ्या लॉक डाऊन फेजमध्ये आहोत. 17 मे ला हा तिसरा टप्पा संपेल, पण त्यांनंतरही आपलं रुटीन सुरु होईल की नाही आता सांगता येत नाही. शाळा 15 जूनला सुरु होतात पण यंदा त्या कधी सुरु होतील काहीच सांगता येणार नाही. तुम्हा मुलांचे रिझटल्सही यंदा ऑनलाईनच समजणार आहेत. अशात शाळाही कदाचित ऑनलाईन सुरु होऊ शकते.
परदेशात जिथे जिथे शाळा या कालावधीत सुरु होतात त्या ऑनलाईन सुरु झालेल्या आहेत. काही ठिकाणी तर सगळं शाळेत करतात तसंच करायचं फक्त घरात अशी पद्धत सुरू झालेली आहे. म्हणजे शाळा भरायच्या वेळी गणवेश घालून आपापल्या मोबाईल किंवा कम्युटरसमोर बसायचं. प्रत्येक तासाला जो तो शिक्षक ऑनलाईन येऊन शिकवतो. मधली सुट्टीची वेळ झाली की जेवण करायचं आणि दिलेल्या वेळात परत ऑनलाईन यायचं. नेहमी ज्या वेळेला शाळा सुटते तशीच सुटणार अशा पद्धतीने परदेशात ऑनलाईन शाळा सुरु केलेल्या आहेत.
पण आपली परिस्थिती जरा वेगळी आहे. सगळ्यांच्या घरात कम्प्युटर आणि वायफायच्या सुविधा नाहीत. आपल्या मनपा आणि झेडपीच्या शाळेत शिकणा ऱ्या मुलांकडे अनेक तांत्रिक सुविधा नाहीत. अशावेळी ते ऑनलाईन शाळेत सहभागी होऊ शकतीलच असं नाही. त्यामुळे ऑनलाईन शाळा कशा सुरु करता येतील हा मोठा प्रश्नच आहे. कदाचित त्यासाठी व्हॉट्स ?पचा वापर आपल्याकडे होऊ शकतो. म्हणजे ज्या त्या विषयाच्या शिक्षकाने ज्या त्या धड्याचे व्हिडीओज बनवायचे आणि whats app ग्रुप वर टाकायचे. आणि इतर नोट्सच्या फाईल्स ही whats app वर द्यायच्या असा एक मार्ग आपल्याकडे काढता येऊ शकेल. कारण व्हॉट्स अप बहुतेक सगळ्यांकडे असतं. शिकवण्या ऑनलाईन झाल्यावर पेपरही ऑनलाईन घ्यावे लागतील, ते कसं करता येईल याबाबतही विचार सुरु आहेतच.
परदेशात जितक्या सोप्या पद्धतीने ऑनलाईन शाळा घेतल्या जाऊ शकतात तितक्या आपल्याकडे शक्य नाही. कारण आपल्या देशात गरीब विद्याथ्र्यांची संख्या मोठी आहे. पण शाळा जर इतक्यात सुरु होणार नसतील तर काही ना काही पर्याय तर शोधावेच लागतील. ते काय असतील हे लवकरच समजेल आपल्याला.