‘ही’ शाळा भरते तुमच्या घरातच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 07:02 AM2020-05-17T07:02:00+5:302020-05-17T07:05:01+5:30
onlineशाळा म्हणजे असतं तरी काय?
- रणजितसिंह डिसले प्राथमिक शिक्षक, परीतेवाडी शाळा
ऑनलाईन शाळेत शिक्षक असतात, विद्यार्थी असतात, नसते ती शाळेची वर्गखोली.
या शाळेत जायचं असेल तर तुम्हांला दुसरीकडे कुठे जायची गरज नसते. घरी बसून या शाळेत जाता येत. रोज उठून स्कूल बस पकडायची आता गरज नाही. शाळेला दांडी मारून घरी मज्जा करायला अनेकांना आवडते.
पण ही ऑनलाईन शाळा तुमच्या घरातच भरते. या शाळेत जाण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल किंवा टीव्ही किंवा लॅपटॉप /डेस्कटॉप असावा लागतो. आणि हो मोबाईल किंवा लॅपटॉप /डेस्कटॉप मध्ये इंटरनेट सुविधा असावी लागते.
बस एवढ असलं कि तुम्हीसुद्धा या ऑनलाईन शाळेला जावू शकतात. आणि हो घरातल्या प्रत्येक मुलाकडे वेगळा मोबाईल असण्याची गरज नाहीये. एकच मोबाईल तुम्ही तुमच्या भावंडात शेअर करून या शाळेत जाऊ शकता.
काही जण म्हणतील कि आमच्याकडे तो इंटरनेटवाला स्मार्टफोन नाहीये, आमच्याकडे साधा मोबाईल आहे.
काहीजण म्हणतील कि आमच्या घरी फक्त टीव्ही आहे, मग आम्ही कसे जाणार या ऑनलाईन शाळेत?
घाबरू नका, तुम्हांला देखील या ऑनलाईन शाळेत जाता येईल. फक्त तुम्हांला या शाळेतील घडामोडी ऑफलाईन शिकाव्या लागतील.
ऑनलाईन शाळेची गंमत अशी आहे कि इथ तुम्ही काय शिकणार? कोणत्या शिक्षकांकडून शिकणार ? हे देखील तुम्ही ठरवू शकता. आपल्या शाळेतील एखादे शिक्षक आपल्याला खूप आवडत असतात, पण ते तुमच्या वर्गाला न शिकवता दुसऱ्याच वर्गात शिकवत असतात. आता तुम्ही त्या सरांच्या वर्गात जावू शकता , ते ही व्हर्च्युअली .. कसे काय? त्यासाठी वाचा उद्याचा लेख!