शाळा ‘ऑनलाईन’ कशी भरते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 07:10 AM2020-05-19T07:10:00+5:302020-05-19T07:10:06+5:30
onlineशाळा म्हणजे असतं तरी काय?
- रणजितसिंह डिसले , प्राथमिक शिक्षक, परीतेवाडी शाळा
- तर ही ऑनलाईन शाळा चालते कशी? हे पाहा -
1. ऑनलाईन शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी आपापल्या घरी असतात. काही वेळा ऑनलाईन वर्ग घेणारे शिक्षक एखाद्या स्टुडीओ मध्ये जावून तिथून क्लास घेत असतात.
2. ही ऑनलाईन शाळा दोन प्रकारे भरत असते. एक म्हणजे थेट प्रसारित होणारा क्लास आणि दुसरा म्हणजे आधीच रेकॉडिर्ंग केलेले व्हिडिओ.
3. थेट प्रसारित होणारा क्लास हा आपल्या रोजच्या शाळेतील तासांप्रमाणो असतो. एका विशिष्ट वेळी सगळी मुलं आणि शिक्षक ऑनलाईन येतात.
4. एकत्र येण्यासाठी ते विशिष्ट असं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप वापरत असतात.
5. इथे सगळी मुले एकमेकांना पाहू शकतात, एकमेकांशी गप्पा मारू शकतात. काहीजण तर एकमेकांना सिक्रेट मेसेज सुद्धा पाठवतात.
6. या ऑनलाईन वर्गात गोंधळ होवू नये म्हणून शिक्षक तुमचा माईक आणि व्हिडिओ बंद करून ठेवतात. फक्त सरांचा माईक आणि कॅमेरा सुरु असतो.यामुळे दुसरा फायदा असाही होतो कि तुमचा डेटा कमी खर्ची पडतो.
7. इथे सरांकडे खडू नसतो तर त्या ऐवजी ते डिजिटल पेन वापरतात. आपले सर फळ्यावर आकृत्या काढून, वेगवेगळे शब्द लिहून अधिक स्पष्टीकरण देत असतात.
8. सरांसाठी विशिष्ट असा व्हाईट बोर्ड यासाठी वापरला जातो, ज्यावर फक्त शिक्षकच लिहू शकतात.
9. तुम्ही फक्त त्या फळ्याकडे पाहत सर काय बोलतात, ते ऐकायचं असतं.
10. जर तुम्हांला काही समजलं नाही तर लगेच हात वर करायचं बटण दाबायचं, मग तुमच्या सरांना लगेच समजत कि याला काहीतरी विचारायचं आहे. लगेच तुमचा माईक ऑन करून तुम्हांला बोलण्याची संधी दिली जाते.
.. आहे न मज्जा.