coronavirus : पॉपीने  कुणाला  लिहिली   प्रेमळ पत्रं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 09:42 PM2020-04-09T21:42:57+5:302020-04-09T21:47:21+5:30

जगभरातली ‘घर-बंद’ मुलं सध्या काय करताहेत?

coronavirus: abu-dhabi-mum-launches pen-pals-for-homebound-children, poppy sherwood | coronavirus : पॉपीने  कुणाला  लिहिली   प्रेमळ पत्रं?

coronavirus : पॉपीने  कुणाला  लिहिली   प्रेमळ पत्रं?

Next
ठळक मुद्देपत्र लिहिण्यात पॉपीचा आता बराच वेळ जाऊ लागला आहे

आता काय करू?’ हाच  प्रश्न अबूधाबीत राहणा:या पॉपी शेरवूड नावाच्या मुलीलाही पडला होता. या प्रश्नावर तिच्या आईनं तिला सुचवलेल्या  ‘आयडिया’मुळे पॉपी सध्या खूपच खूष आहे. आशा शेरवूड ही पॉपीची आई.  गेल्या दोन आठवड्यांपासून अबूधाबीमध्येही लॉक डाऊन सुरू आहे. पॉपीला खूप कंटाळा आल्यावर तिच्या आईनं तिला पत्र लिहिण्याची कल्पना सूचवली.  
पॉपीची आई  ‘अबू धाबी रिव्ह्यू’ची संस्थापिका. तिनं आपल्या मित्रच्या मुलीशी पॉपीची फोनवर गाठ घालून दिली.  या दोघींनी एकमेकींना पत्र लिहायचं ठरवलं. सुरूवातीला दोघीच एकमेकींना पत्र लिहू लागल्या. पण आता त्यांच्या सोबतीनं अनेक मुलं मुली पत्र लिहित आहेत. कारण पॉपीच्या आईनं  ‘पेन पाल’ म्हणजे पेन मित्र नावाचा एक ग्रूपच तयार केला आहे. 


पत्रं हातानं लिहायचं आणि ते पोस्टानं न पाठवता डिजिटली पाठवायचं. मग समोरचाही डिजिटल साधनांचा उपयोग करून उत्तर पाठवतो.
आता पॉपी  आपल्याला काय म्हणायचंय, काय सांगायचंय याबद्दल आधी विचार करून मग लिहू लागलीय. पॉपीचा शब्दसंग्रहही सुधारू लागला आहे.   पॉपीकडे पत्रतून अनेक नवीन शब्द जमू लागले आहेत.
पत्र लिहिण्यात पॉपीचा आता बराच वेळ जाऊ लागला आहे. त्यामुळे तिचा स्क्रीन टाइमही आपोआपच कमी झाला आहे.  
ती आता पूर्वीइतकी जास्तवेळ टी.व्ही किंवा कम्प्युटरसमोर बसत नाही. 

Web Title: coronavirus: abu-dhabi-mum-launches pen-pals-for-homebound-children, poppy sherwood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.