चिनमध्ये जे बरे झाले त्यापैकी काहींना पुन्हा कोरोना झाला, हे खरंय का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 05:08 PM2020-04-16T17:08:00+5:302020-04-16T17:17:25+5:30

कोरोना पुन्हा येऊ शकतो का? पुण्याहून विशाखाने प्रश्न विचारलाय, कारण ती म्हणते, तिला भीती वाटतेय !

coronavirus : cases-rise-china-health-officials-warn-relapse | चिनमध्ये जे बरे झाले त्यापैकी काहींना पुन्हा कोरोना झाला, हे खरंय का ?

चिनमध्ये जे बरे झाले त्यापैकी काहींना पुन्हा कोरोना झाला, हे खरंय का ?

Next
ठळक मुद्दे घरातच राहिलो तर नक्कीच आपण या आपत्तीवर मात करू शकतो.

रोना चीनमध्ये पुन्हा परतून आलाय असं मी वाचलं, ते खरं आहे का? असं होऊ शकतं का? -विशाखा गायकवाड, पुणो विशाखा, हो ही बातमी खरी आहे. चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. जे रुग्ण बरे झाले होते आणि ज्या रुग्णांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले होते त्यांना परत कोव्हीड 19ची लागण झालेली दिसून येते आहे. आणि त्यांचे रिपोर्ट्स कोव्हीड 19साठी पॉङिाटिव्ह आल्याचंही दिसतंय. डेली मेल या यूकेमधल्या वृत्तपत्रनुसार जवळपास 14 टक्के लोकांना परत कोरोना झाला आहे. याखेरीज काही लोक सायलंट कॅरिअरही असतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांच्या शरीरात कोरोनाचा विषाणू शिरलेला असतो; पण आजाराची लक्षणं दिसत नसतात.

चीनमध्ये हे झालं, कारण तिथे पहिल्यांदा साथ पसरली तेव्हा परदेशी असलेले चीनचे नागरिक आता परत येऊ लागले आहेत, आणि त्यांच्याबरोबर हा संसर्ग परत येतो आहे. आता चीनमध्ये मोठय़ा प्रमाणावर टेस्टिंग सुरू होणार आहे. जेणोकरून कोरोनाशी लढा द्यायला त्यांना सोपं जाईल. ज्यांच्यामध्ये लक्षण दिसतील त्यांना 14 दिवस क्वॉरण्टाइन करण्यात येतंय. कोरोनाचा विषाणू नुसता स्पर्शानेही पसरतोय. त्यामुळे त्याच्यावर मात करणं जरा कठीण जातंय. पण आपण सगळ्यांनी मिळून न घाबरता, सरकारने ज्या गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत त्या केल्या, सतत हात स्वच्छ धुतले, तोंडावर मास्क घातला आणि घरातच राहिलो तर नक्कीच आपण या आपत्तीवर मात करू शकतो.

Web Title: coronavirus : cases-rise-china-health-officials-warn-relapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.