कोरोनाचं DIY काय हरकत आहे, एक डायरी बनवायला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 07:00 AM2020-06-06T07:00:00+5:302020-06-06T07:00:11+5:30

दुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

coronavirus : DIY - make a info diary | कोरोनाचं DIY काय हरकत आहे, एक डायरी बनवायला?

कोरोनाचं DIY काय हरकत आहे, एक डायरी बनवायला?

Next
ठळक मुद्देया सगळ्या आठवणी तुमच्यकडे आयुष्यभर राहतील. 

.ऊर्जाच्या पानात कोरोनाबद्दल पुष्कळ माहिती दिलेली असते. तुम्हा मुलांच्या प्रश्नांची उत्तरं असतात. कोरोना हा विषाणू कसा आहे, त्यापासून होतो त्या कोविडपासून बचाव कसा  करायचा. त्यासाठी स्वच्छतेची काळजी कशी घ्यायची अशी सगळी माहिती तुम्ही वाचत असणार. मग त्यातूनच एक डीआयवाय बनवलं तर?
साहित्य: कोरोना विषयी तुमच्याकडे असलेली सगळी माहिती, कोरे पांढरे कागद, पेन्सिल, पेन, रंग 
कृती: 
1) तुमच्याकडे भरपूर कोरोनाविषयी माहिती गोळा झालेली आहे. तीच साहित्य म्हणून वापरूया. कशी?
2) एकतर तुम्ही कोरोनाविषयी एखादा सुंदर लेख लिहू शकता. निबंध लिहू शकता. तुम्हाला माहित असलेल्या गोष्टी, तुमचे अनुभव लिहू शकता. 
3) तुम्ही एक छोटी डायरी करा आणि त्या डायरीत रोजच्या रोज कोरोनाविषयी तुम्ही काय वाचलंत, काय पाहिलंत, त्याविषयी तुम्हाला काय वाटतंय असं सगळं लिहून काढा. 


4) कोरोनाची माहिती देणारं, हात कसे धुवायचे याची माहिती देणारं कॉमिक तुम्ही बनवू शकता. त्यासाठी चित्र काढू शकता. 
5) तुमचा निबंध, डायरी यातही तुम्ही कोरोनाबद्दल जो काही विचार करत आहात तो चित्रतून मांडू शकता. 
6) आपल्या मनातल्या विचारांना, भीतीला शंकेला मोकळं केलं पाहिजे. आणि आताच्या लॉक डाऊन काळात तर हे खूप गरजेचं आहे. हे करता करता तुम्हीच असेही रिलॅक्स होऊ शकता. 
7) या सगळ्या आठवणी तुमच्यकडे आयुष्यभर राहतील. 
 

Web Title: coronavirus : DIY - make a info diary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.