coronavirus : आपला मास्क आपल्याला बनवता नाही का येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 05:55 PM2020-04-11T17:55:11+5:302020-04-11T18:03:37+5:30

मास्क लावणं गरजेचं आहे. पण घरातल्या सगळ्यांसाठी मास्क आणायचे कुठून? कारण मास्क ज्याचा त्यानेच वापरायचा असतो.

coronavirus: dIY - make your own mask @ home. | coronavirus : आपला मास्क आपल्याला बनवता नाही का येणार?

coronavirus : आपला मास्क आपल्याला बनवता नाही का येणार?

Next
ठळक मुद्देहे मास्क आपण कुठल्याही स्वच्छ कापडाचे बनवू शकतो.

- गौरी पटवर्धन

आपल्याला वेळ आहे म्हणून घरातली मोठी माणसं आपल्याला घरातली कामं चिकटवतायत म्हणून वैतागलायत ना? हस्तकलेचे वेगवेगळे प्रकार बनवून कंटाळा आलाय ना? त्यात आपण काहीही करायला घेतलं तरी कोणीतरी म्हणतं,,  ‘‘कशाला पसारा घालतेस/घालतोस?’’
 म्हणजे आपण जीव रमवण्यासाठी काहीतरी वस्तू बनवतो तर इतरांसाठी तो लगेच पसारा ठरतो. मग अशा वेळेला करायचं काय? तर आपण अशी काही तरी भारी वस्तू बनवायची जी सगळ्यांना लागते आणि शिवाय जी घरातल्याच जुन्या वस्तूंपासून तयार होऊ शकते. 
तर सध्या अशी कुठली गोष्ट आहे???


- मास्क!
1. कितीही लॉकडाऊन आहे असं म्हंटलं, तरी सुद्धा काहीतरी महत्वाच्या कामासाठी घरातल्या मोठ्या माणसांना कधीतरी बाहेर जायला लागतं. 
2. औषधं, किराणा, भाजी, दळण, दूध या कामांसाठी कोणीतरी घरातून बाहेर जातं किंवा कोणीतरी या वस्तू आपल्याला घरी आणून देतं. 
3. पण आत्ताची परिस्थिती लक्षात घेता कोणीही बाहेरच्या माणसाला एक मिनिटासाठी जरी भेटणार असेल, तरी त्याने मास्क लावणं गरजेचं आहे. पण घरातल्या सगळ्यांसाठी मास्क आणायचे कुठून? कारण मास्क ज्याचा त्यानेच वापरायचा असतो.
4.मग इतके सगळे मास्क कुठे मिळतील?
5. तर आपण हे मास्क घरच्या घरी बनवू शकतो. म्हणजे निदान आपल्याला रोज वापरायला लागतात तसे मास्क्स तरी आपण बनवू शकतो.
6. हे मास्क आपण कुठल्याही स्वच्छ कापडाचे बनवू शकतो. म्हणजे जुने टीशर्टस, ओढण्या, जुन्या कॉटनच्या साड्या अशा कुठल्याही कपड्याचा मास्क बनवता येतो.
7. त्यासाठीची पहिली पायरी म्हणजे हा कपडा स्वच्छ धुवून वाळवून घ्यायचा. 
- मग आपण त्याचा मास्क कसा बनवू शकतो ते उद्या शिकूया.
 

Web Title: coronavirus: dIY - make your own mask @ home.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.