coronavirus : इटालीतला आंद्रेया, त्याचे बाबा कोरोनाशी  लढताहेत आणि  तो .. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 04:56 PM2020-04-07T16:56:46+5:302020-04-07T16:59:34+5:30

इटलीमधली मुलं काय बरं करत असतील घरात असं शोधलं असता आंद्रेया नावाचा एक सहा वर्षाचा मुलगा आणि त्याची गोष्ट इंटरनेटवर सापडली.

coronavirus : italian-kids-life-in-lockdown | coronavirus : इटालीतला आंद्रेया, त्याचे बाबा कोरोनाशी  लढताहेत आणि  तो .. 

coronavirus : इटालीतला आंद्रेया, त्याचे बाबा कोरोनाशी  लढताहेत आणि  तो .. 

googlenewsNext
ठळक मुद्देबाहेर गेलं की तो कोरोनाचा विषाणू आपल्याला गाठेल. म्हणून घरातच राहा असं आंद्रेया सारखं सांगतो आहे.

मार्चच्या सुरुवातीला इटलीमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढू लागले आणि हळूहळू शाळा, कॉलेज, ऑफिस सारं काही बंद झालं. मुलं आपल्या आईबाबांसोबत घरातच राहू लागली. ही इटलीमधली मुलं काय बरं करत असतील घरात असं शोधलं असता आंद्रेया नावाचा एक सहा वर्षाचा मुलगा आणि त्याची गोष्ट इंटरनेटवर सापडली.
आंद्रेया हा इटलीमधील कॅटॅनिया शहरात राहातो. सध्या या लॉकडाउनच्या परिस्थितीत तो घरी आई आणि आपल्या लहान बहिणीसमवेत राहतो आहे. त्याला आपल्या वडिलांची खूप आठवण येते आहे. आपल्या वडिलांना कधी एकदाचं भेटू असं त्याला झालं आहे. पण तो आपल्या बाबांना पाहू शकत नाहीये. कारण त्याचे बाबा दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्याला त्याच्या आईनं आपले बाबा घरी बरे होऊन येणार असल्याचं सांगितलं आहे. पण तरीही त्याला बाबाची खूप आठवण येते आहे.
आंद्रेयाला चित्र काढायला खूप आवडतं. तो आपल्या वडिलांबद्दलच्या भावना चित्रत व्यक्त करतो आहे. तो काढत असलेलं चित्र त्याच्या बाबांवर उपचार करणारे डॉक्टर त्यांच्यार्पयत पोहोचवत आहेत. एका चित्रत आंद्रेयानं आपण हा कोरोना व्हायरसचा प्रसार
कसा थांबवू शकतो हे दाखवलं आहे. त्या चित्रबद्दल आंद्रेया सांगतो की, आपलं जग आणि कोरोना व्हायरस यामध्ये एक दरवाजा आहे. तो कुणाकडून तरी चुकून उघडा राहिला आहे. त्यामुळे हा कोरोना व्हायरस आपल्या जगात शिरतो आहे. पण हा दरवाजा बंद करणं सोपं
नसतं. त्याला प्रचंड ताकद हवी असते. ही ताकद ‘सुपर आंद्रेया’ आणि ‘सुपर डॅडी’ यांच्याकडेच असते. त्यामुळे आपले बाबा जोर्पयत बरे होऊन घरी येत नाही तोर्पयत हा दरवाजा आपण बंद करू शकत नाही असं तो शेवटी म्हणतो. या चित्रखाली त्यानं आपल्या वडिलांसाठी एक संदेशही लिहिला आहे. ‘बाबा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही लवकर घरी याल असा मला विश्वास आहे.
तुम्ही घरी आलात की आपण खूप खेळू.’एका चित्रत या कोरोना व्हायरसपासून स्वत:ला सुरक्षित
ठेवण्याचा उपायही आंद्रेया सांगतो. तो म्हणतो की, हा कोरोना पसरू नये म्हणून आपण घरातच राहायला हवं.
त्यामुळे कोणी जास्त खाऊ नका. जास्त खाल्लं तर घरातलं सामान संपून जाईल आणि मग ते आणायला बाहेर जावं लागेल. बाहेर गेलं की तो कोरोनाचा विषाणू आपल्याला गाठेल. म्हणून घरातच राहा असं आंद्रेया सारखं सांगतो आहे.

 

Web Title: coronavirus : italian-kids-life-in-lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.