coronavirus : चीनमधली मुलं दोन महिने झाले घरात आहेत, त्यांचा वेळ कसा जातो?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 03:16 PM2020-03-28T15:16:52+5:302020-03-28T15:23:22+5:30
गेल्या दोन महिन्यांपासून चीनमधील लहान-मोठी सर्व मुलं आपल्या आई-बाबांबरोबर घरात कडीबंद आहेत. काय बरं करत असतील ते घरात बसून?
आपल्याकडे कोरोनामुळे शाळा बंद होऊन मुलं घरात बसली ती अगदी आत्ता आठवडय़ाभरापूर्वी! पण कोरोनाचा पहिला संसर्ग झाला चीनमध्ये. त्यामुळे त्या देशात गेल्या दोन महिन्यांपासून शाळेला सुट्टी आहे. गेल्या दोन महिन्यांपासून चीनमधील लहान-मोठी सर्व मुलं आपल्या आई-बाबांबरोबर घरात कडीबंद आहेत. काय बरं करत असतील ते घरात बसून? मुलांना कंटाळा आला नसेल का? - हे पाहा त्यांनी काय काय केलं ते
1. चीनमध्ये शिस्त फार. त्यामुळे शाळा बंद असली तरी अभ्यास बंद नको म्हणून तिथल्या शाळांनी ई-लर्निग सुरू केलं. त्यामुळे दिवसाचा बराचसा वेळ मुलांचा ऑनलाइन शिकण्यातच जातो आहे.
2. मुलांची ऑनलाइन शाळा, तसं आई-बाबांचं पण ऑनलाइन ऑफिस सुरूच आहे; त्यामुळे सगळेच सध्या घरात आहेत!
3. आळस करायचाही कंटाळा आल्यावर अनेक घरांनी उठण्यापासून झोपण्यार्पयतचं एक वेळापत्रक बनवलं. अभ्यासाच्या वेळी अभ्यास, खेळायच्या वेळी खेळ असं ठरलं.
4. अभ्यासानंतर मुलं आनंदानं पुस्तकं वाचू लागली. चित्रं काढू लागली. हस्तकलेच्या वस्तू बनवू लागली.
5. चीनमधली अनेक मुलं सध्या मोङॉक आर्ट, सिरॅमिक पेण्टिंग शिकत आहेत.
6. घरात सगळे मिळून मोनोपोली, पत्ते, उनोसारखे बैठे खेळ खेळत आहेत.
7. अनेक मुलं आपल्या आईसोबत स्वयंपाक करीत आहेत. नवीन पदार्थ शिकत आहेत.
8. सध्या चीनमध्ये वसंत ¬तू सुरू आहे. त्यामुळे मुलं आई-बाबांच्या मदतीनं घरातल्या अंगणात भाजी आणि फुलांची शेती करण्याचा प्रयोग करीत आहेत.
9. पालकांनी आपल्या मुलांच्या मित्र-मैत्रिणींचे सोशल मीडियावर ग्रुप केले आहेत. मुलं घरात करीत असलेली अॅक्टिव्हिटी, नाटक, गाणं, डान्स हे शूट करून ते ग्रुपवर टाकत आहेत. टिकटॉक व्हिडीओ बनवित आहेत.
1क्. व्यायामाचे अॅप्स फोनवर डाउनलोड करून आई-बाबा आणि मुलं एकत्र व्यायाम करीत आहेत.