क्या  भिडू ? करते क्या तुम कोरोना  रॅप ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 07:29 PM2020-04-24T19:29:37+5:302020-04-24T19:32:14+5:30

गावभर हुंदडायचं सोडून तुम्ही घरात बसून कागदाचे कावळे चिमण्या का बनवताय? त्या ऐवजी एक आयडिया सांगू का?

coronavirus : lockdown : DIY - learn how to write rap song? | क्या  भिडू ? करते क्या तुम कोरोना  रॅप ?

क्या  भिडू ? करते क्या तुम कोरोना  रॅप ?

Next
ठळक मुद्देहा करोना का आला का आला


आम्ही हे लेख पेपरमध्ये का लिहितोय? आणि तुम्ही गावभर हुंदडायचं सोडून गपचूप शहाण्या मुलांसारखे घरात बसून ते लेख का वाचताय? मित्र मैत्रिणी गोळा करून दंगा करायचा, वेळीअवेळी क्रिकेट खेळून लोकांच्या घराच्या काचा फोडायच्या, त्यावरून बोलणी खायची, संध्याकाळभर हुंदडून हट्ट करून कुठेतरी बर्फ गोळा नाहीतर मटका कुल्फी खायचं सोडून तुम्ही घरात बसून कागदाचे कावळे चिमण्या का बनवताय? तर जगभर तो करोना नावाचा विषाणू हैदोस घालतोय म्हणून. तो पसरू नये म्हणून सरकारने लॉकडाऊन जाहीर केलाय. अगदी गरजेच्या वस्तू सोडून इतर काही आणायला जायला सुद्धा परवानगी नाहीये. जगभरातले लोक त्यांच्या त्यांच्या परीने करोनाबद्दल, लॉकडाऊन बद्दल त्यांचं मत नोंदवतायत. डॉक्टर्सचे आभार मानतायत.
-  पण या सगळ्यात तुमचं मत कुठे आहे? तुमच्या पण आयुष्यावर करोनामुळे इतका परिणाम झालाय. पण तुम्ही तर त्यावर काही बोलतच नाही आहात. परत जेव्हा शाळा सुरु होईल तेव्हा तुमचे भाषेचे शिक्षक तुम्हाला करोना या विषयावर निबंध लिहायला सांगतीलच. पण एकतर त्याला फार वेळ आहे आणि दुसरं म्हणजे निबंध हा तसा अभ्यासातला एक भाग आहे. त्यापेक्षा तुम्ही करोनाबद्दल एखादं रॅप सॉंग का लिहीत नाही? एक नमुन्याचं आम्ही लिहिलंय. पण ते काही फार भारी झालं नाहीये. तुम्हाला जमतंय का बघा बरं.. करोनाबद्दल, पोलिसांबद्दल, डॉक्टर्सबद्दल किंवा करोनासंबंधी इतर कशाहीबद्दलङ्घ लिहून तर बघा!

 

हा करोना का आला
त्याने केलाय राडा
त्याने केली गोची
घरामध्ये झोपडीमध्ये
रस्त्यात राहणा?्यांची
नुसती वाट लावलीय
हा करोना का आला
का आला 

त्याला इथून हाकला
तो इथे का आला
आम्हाला बाहेर जायला
त्याला इथून घालवा
याने सुट्टी वाया जाते
हा करोना का आला
का आला

Web Title: coronavirus : lockdown : DIY - learn how to write rap song?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.