त्यांना  थँक्स  म्हंटलं  का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 07:40 AM2020-05-31T07:40:00+5:302020-05-31T07:40:01+5:30

थँक यू ... तरी आपल्यासाठी काम करत असलेल्या लोकांना किती बरं वाटतं!

coronavirus : lockdown- say thanks to care givers. | त्यांना  थँक्स  म्हंटलं  का ?

त्यांना  थँक्स  म्हंटलं  का ?

googlenewsNext
ठळक मुद्दे तुम्ही करत असलेल्या कामाची आम्हाला जाणीव आहे. हे सांगणंही फार महत्वाचं असतं!


तुम्ही ग्रीटिंग कार्डस बनवली असतील ना? शाळेत हस्तकलेच्या तासाला? किंवा कुठल्यातरी मित्रमैत्रिणींच्या वाढदिवसाला? किंवा आईवडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाला? किंवा शिक्षक दिनाला? तुम्ही मस्त कार्डशीट आणलं असेल, त्यावर काहीतरी छान चित्र कापून चिकटवलं असेल, त्याला लेस किंवा बो लावला असेल, त्यावर मस्त चित्र काढलं असेल आणि मग स्वत: तयार केलेलं ते कार्ड तुम्ही तुमच्या लाडक्या माणसाला दिलं असेल. त्यावेळी त्यांना किती आनंद झाला असेल. कारण कोणीतरी आपली आठवण ठेऊन आपल्याला असं कार्ड देतंय ही भावनाच फार छान असते. त्यामुळे आपल्यासाठी काहीतरी करणा?्या माणसाला अजून चांगलं काम करण्याचा हुरूप येतो. मग असं कार्ड आपल्यासाठी काम करणा?्या इतर लोकांनाही आपण देऊ शकतो का?
अशी खूप माणसं असतात, ज्यांच्या कामामुळे आपलं आयुष्य सोपं होत असतं. उदाहरणार्थ सफाई कर्मचारी. या सगळ्या कोव्हिडच्या संकटात सुद्धा आपलं गाव, शहर, रस्ते स्वच्छ दिसतात कारण आपल्या शहरातले स्वच्छता कर्मचारी त्यांचं काम करत असतात. रोज सकाळी ते ठरलेल्या वेळी घंटागाडी घेऊन येतात. रोज आपल्या घरातला कचरा घेऊन जातात. पण त्यांना कोणी थँक यू म्हणत नाही.
आपलं आरोग्य सांभाळण्याच्या कामी डॉक्टर जितका महत्वाचा असतो तितकाच सफाई कर्मचारी महत्वाचा असतो. डॉक्टर आपल्याला आजारी पडल्यावर बरं करतो, तर सफाई कर्मचारी स्वच्छता ठेऊन आपण आजारी पडूच नये याची सोय करत असतो. मग आपल्यासाठी इतकं काम करणा?्या लोकांना निदान एक छोटं थँक यू कार्ड तरी आपण द्यायला पाहिजे ना?


मग काढा तुमचं हस्तकलेचं साहित्य बाहेर! कार्डशीट, रंग, पेन, पेन्सिली, स्केच पेन्स आणि तुम्हाला वाटणारी कृतज्ञता मस्त कार्ड बनवून पोचवा त्यांच्यापयर्ंत. त्यांना सांगा, की तुम्ही करत असलेल्या कामाची आम्हाला जाणीव आहे. हे सांगणंही फार महत्वाचं असतं!


 

Web Title: coronavirus : lockdown- say thanks to care givers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.