इन्फोमॅनिया म्हणजे काय? हा कुठला नवा आजार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 08:00 AM2020-05-10T08:00:00+5:302020-05-10T08:00:07+5:30

सतत माहितीसाठी धडपण्याला या विषयात काम करणारे इन्फोमॅनिया म्हणतात. 

coronavirus : lockdown : What is infomania? is this a new disease | इन्फोमॅनिया म्हणजे काय? हा कुठला नवा आजार ?

इन्फोमॅनिया म्हणजे काय? हा कुठला नवा आजार ?

Next
ठळक मुद्देअनेकदा चुकीची माहिती, खोटी माहितीही आपल्यापर्यंत  पोचत असते. 

मी पेपर वाचत असताना लॉक डाऊन मुळे लोकांना इन्फोमॅनिया झाला आहे असं वाचलं. इन्फोमॅनिया म्हणजे काय? - आदित्य शिरोळकर, सांगली

आदित्य, सध्या घरातली सगळीच माणसं सतत ऑनलाईन आहेत. त्यामुळे सतत प्रचंड माहिती पोचत असते. या इतक्या सगळ्या माहितीची आपल्याला गरज आहे की नाही हे वेगळं पण व्हॉट्स ऍप मुळे आणि इतरही अनेक ऍप  आणि सोशल मीडियामुळे आपल्याला गरज नसतानाही प्रचंड माहिती आपल्या पुढ्यात असते आणि आपण ती वाचत, बघत ऐकत असतो.  आता याचा विचार कर-
1. सतत माहिती मिळत राहिली नाही तर आपलं आयुष्य अपूर्ण आहे असं वाटणं म्हणजे इन्फोमेनिया. 


2. माहिती मिळवण्याचं आणि त्याचा उपभोग घेण्याचं व्यसन लागू शकतं का? तर हो. कोरोना विषयीच्या खऱ्या  खोट्या माहितीचा अतिरेक झालेला आहे तरीही लोक सतत त्याविषयी शोधत असतात, वाचत असतात. किंवा सतत सोशल मीडियावर जाऊन वेगवेगळी माहिती गोळा करत असतात. 
3. या सगळ्या माहितीचा आपल्याला उपयोग असतो का? तर नक्कीच नाही, पण ती मिळवली नाही तर आपण जगाच्या मागे पडू अशी भीती निर्माण होते आणि लोक अधिकाधिक माहितीच्या मागे लागतात.  
4. त्यासाठी मग सतत ऑनलाईन राहणं, सतत फोनवर येणाऱ्या  बातम्यांचे नोटिफिकेशन्स बघत बसणं, नेट बंद झालं तर कसंतरी होणं हे प्रकार सुरु होतात. 
5. माहितीची गरज आहेच पण त्याचा अतिरेक धोकादायक असतो. 
6. शिवाय सोशल मीडियाच्या या काळात आपल्या पर्यंत  पोचणारी सगळी माहिती खरी असतेच असं नाही. अनेकदा चुकीची माहिती, खोटी माहितीही आपल्यापर्यंत  पोचत असते. 
- त्यामुळे असं सतत माहितीसाठी धडपण्याला या विषयात काम करणारे इन्फोमॅनिया म्हणतात. 

Web Title: coronavirus : lockdown : What is infomania? is this a new disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.