coronavirus : कोरोनावर औषध नाही? ते कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 10:10 PM2020-04-09T22:10:08+5:302020-04-09T22:12:16+5:30

यूएस नॅशनल इन्स्टिट्यूटचे संशोधक डॉ. थोनी फाउसी यांच्या म्हणण्यानुसार मानवी चाचण्या आवश्यक काळात पूर्ण झाल्या तर ही लस 12 ते 18 महिने म्हणजेच आजपासून वर्ष दीड वर्षात उपलब्ध होईल.

coronavirus: vaccine 'could be ready soon! | coronavirus : कोरोनावर औषध नाही? ते कधी मिळणार?

coronavirus : कोरोनावर औषध नाही? ते कधी मिळणार?

Next
ठळक मुद्देहात धुवायचे, स्वच्छता पाळायची आणि सध्यातरी घरातच बसायचं. 

कोरोनाची लस कधी निघेल?
कोरोनावर लस शोधण्याचे प्रय} जगभर सुरु आहेत.  या महामारीवरच्या लसीचे पहिले मानवी टेस्टिंग अमेरिकेत सुरु झाले आहे. या लसीच्या सुरुवातीच्या चाचण्या माकडांवर यशस्वी झाल्यावर मानवावर चाचण्या सुरु झाल्या आहेत. आणि 43 वर्षांची जेनिफर हॉलर,  मायक्रोसॉफ्ट या कंपनीत काम करणारे नील ब्राउनी यांचा पहिल्या चाचणीत समावेश होता. अजून 500 लोकांवर या चाचण्या होणार आहेत आणि  यात लोकं स्वत:हून पुढाकार घेऊन सहभागी होत आहेत. या सगळ्यांना ChAdOx1 nCoV-19 vaccine  ही लस टोचण्यात येणार आहे. 
आफ्रिकेत 2014 मध्ये इबोला आऊटब्रेक झाला होता तेव्हाही अशीच झटपट त्याची लस विकसित करण्यात शास्त्रज्ञाना यश आलं होतं त्यामुळे आपल्याला लवकरच कोरोनावर लस मिळेल. यूएस नॅशनल इन्स्टिट्यूटचे संशोधक डॉ. थोनी फाउसी यांच्या म्हणण्यानुसार मानवी चाचण्या आवश्यक काळात पूर्ण झाल्या तर ही लस 12 ते 18 महिने म्हणजेच आजपासून वर्ष दीड वर्षात उपलब्ध होईल. 


कोरोना लस कशी बनवली जातेय?


सर्वसाधारणपणो लस दिली जाते ती रोग होऊ नये यासाठी. लस रोग बरा करण्यासाठी नाही तर होऊच नये यासाठी दिली जाते. लस बनवताना ज्या त्या रोगाचे मेलेले किंवा अर्ध मेलेले जंतू वापरून बनवली जाते. अशी लस शरीरात पोचली की त्या रोगाशी लढण्याची शरीराची तयारी होती. आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पण कोरोनाची लस बनवण्यासाठी प्रयोगशाळेत कोरोनाच्या विषाणूचा जेनेटिक कोड कॉपी करून त्यापासून लस बनवली जातेय. त्यामुळे ती प्रभावशाली बनेल आणि लवकरच आपल्याला उपलब्ध होईल. तोवर हात धुवायचे, स्वच्छता पाळायची आणि सध्यातरी घरातच बसायचं. 


या लसीचे काही साईट इफेक्टस आहेत का?


प्रत्येक औषधाचे काही ना काही परिणाम होतात. ते नेमके काय असतात हे मानवावर चाचण्या झाल्याशिवाय समजू शकत नाही. म्हणूनच कोरोनाच्या मानवी चाचण्या महत्वाच्या आहेत. 

Web Title: coronavirus: vaccine 'could be ready soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.