coronavirus : आपण सगळे एवढे का घाबरतोय कोरोनाला ? आपण डरपोक आहोत का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 05:31 PM2020-03-27T17:31:48+5:302020-03-27T17:35:01+5:30
आपण सगळीच मुलं लहान असलो तरी ‘समंजस’ आहोत, आपल्याला कळतात प्रॉब्लेम्स.
पण घरात का बसायचं? आपण सगळे कोरोनाला इतके का घाबरतोय? कापण म्हणजे? मुलांनीच का घरात बसायचं? घराबाहेर पार्किगमध्ये पण खेळायचं नाही? मित्रंच्या घरी खेळायला जायचं नाही? बाहेर मैदानात फुटबॉल खेळायचा नाही? सायकल चालवायला जायचं नाही? मित्रंशी कुस्ती खेळायची नाही?का पण असं? का हा मुलांवर अन्याय? मग उपयोग काय या सुटीचा? का आम्हाला असं घरात डांबून ठेवतात? आईबाबा डरपोक आहेत का?-असे प्रश्न तुम्ही आई-बाबांना, आजी-आजोबांना विचारले असतीलच. प्रश्न बरोबरच आहेत. लहान मुलांनी मस्त मैदानात खेळायचं, मित्रंसह पळायचं, मारामारी करायची, मग परत एकत्र खेळायचं हे सगळं सोडून हे काय चाललंय सगळ्यांचंच, की घरात बसा. बाहेर जायचं नाही. सतत हात धुवायचे. घरातच खेळायचं.हे सगळं त्रसदायक नाही का?तर आहेच त्रसदायक. हे सगळे प्रश्नही बरोबरच आहेत. मात्र त्याचं उत्तरही आहे, आणि आपण सगळीच मुलं लहान असलो तरी ‘समंजस’ आहोत, आपल्याला कळतात प्रॉब्लेम्स.
आणि ते सोडवायला मदतही करतोच आपण. तर सध्या असाच एक प्रॉब्लेम झालाय. तो ही फक्त आपल्या शहरात नाही तर जगभरात.
त्याचं नाव कोरोना. ते तर तुम्हाला माहिती आहेच. तर हा कोरोना एकमेकांच्या संपर्कात आल्यानं, स्पर्शानं, कुणी शिंकलं, खोकलंच भसकन तर त्यातून वाढतो. पसरतो. आजारी पाडतो.
आता आपल्याकडे दोनच चॉइस आहेत. ते अव्हेंजर कार्टून मधले अव्हेंजर्स जसे फाइट करून जगाला वाचवतात, तसं आपणही घरात बसून सगळ्यांना वाचवायचं आणि कोरोनाला हरवायचं?
की घराबाहेर पडून त्याला जिंकू द्यायचं? सुटी तर काय भरपूर दिवस आहे.
मित्रंशी दंगा तर शाळा सुरू झाल्यावरही करता येईल; पण या कोरोनाचा एकदा बेत पाहून, त्याला हरवून टाकू.
काय?
जमेल ना जिंकणं?