हॅरी पॉटर घरीच राहिला असता तर या लॉकडाऊन मध्ये त्यानं काय काय केलं असतं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 05:34 PM2020-04-10T17:34:38+5:302020-04-10T17:38:41+5:30
बघा त्याची आई जे. के. रोलिंगने एक खास वेबसाइटच तयार केली आहे.
ब्रेकिंग न्यूज. खरंच ही खूप ब्रेकिंग न्यूज आहे.
बाकी सगळं सोडा आणि ही बातमी वाचा लग्गेच लग्गेच!
हॅरी पॉटर तर तुम्हाला माहितीच आहे. त्याचे काही सिनेमे तुम्ही पाहिले असतील, पुस्तकं वाचली असतील, ऐकली असतील. किंवा यापैकी काहीच केलं नसेल कारण ते सगळं काही आपल्याला उपलब्धच झालं नसेल.
तर त्यासाठीच आहे ही ब्रेकिंग न्यूज.
हॅरी पॉटरची लेखिका जे. के. रोलिंग हिनं एक ट्विट केलं आहे की, तिनं खास लहान मुलं, त्यांचे आईबाबा, आजीआजोबा आणि शिक्षक यांच्यासाठी हॅरी पॉटरची एक वेबसाइटच लॉँच केली आहे.
ती म्हणते ‘जगभरातली मुलं लॉकडाऊनमध्ये अडकली आहे, तर त्यांना मज्जा यायला पाहिजे, अशी काहीतरी जादू करायलाच हवी!’
ती जादूच तिनं या वेबसाइटमध्ये घातली आहे. तिथं लेख, खेळ, अॅक्टिव्हिटी अशी बरीच मज्जा आहे. जगभरातल्या हॅरी पॉटर आवडणा:या मुलांसाठी ही खास भेट आहे.
तर मग तातडीनं तुम्ही त्या वेबसाइटवर जा.
त्या साइटचं नावच आहे, हॅरी पॉटर अॅट होम.
जा तिकडे आणि हॅरीसारखी सगळी जादूच करुन टाका नी काय!