coronvirus : पंतप्रधान मोदी म्हणतात, नजर ठेवा तुमच्या आई- बाबांवर!- का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 07:46 PM2020-04-01T19:46:35+5:302020-04-01T19:50:22+5:30
कुणी बाहेर जायला निघालंच चुकून, तर अडवा त्यांची वाट! खुद्द पंतप्रधानांनीच देशातल्या मुलांना हे काम दिलंय!
मुझे अपनी बालसेनापर पुरा विश्वास है, वे इस बात को सुनिश्चित करेंगे की लोग अपने घरों में रहे, ताकी
कोविड-19 के खिलाफ भारत प्रभावी तरीके से लड सके!’ - हे असं कोण म्हणालं माहितीये? पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि त्यांनी सगळ्या लहान मुलांना एक आवाहनही केलं आहे, मोठं काम दिलं आहे, ते म्हणतात, ‘बनो कोरोना वॉरियर’.
तान्हाजी सिनेमा पाहिल्यापासून किंवा हाउज द जोश म्हणून तुम्हालाही वाटलं असेल ना की, अशा एखाद्या मोहिमेवर आपल्याला जाता आलं असतं, तर आपणही दाखवून दिलं असतं सगळ्यांना की आपण किती ‘ब्रेव्ह’ आहोत ते. मग तेच काम आता पंतप्रधानांनी सगळ्या मुलांना सांगितलं आहे. ते म्हणतात, बना शूर शिपाई ! त्यांनी कालच एक व्हिडीओ ट्वीट केलाय. (त्याची लिंक लेखाच्या शेवटी दिली आहे, आईबाबांना सांगा, तो व्हिडीओ तुम्हाला दाखवायला!) त्या व्हिडीओत सगळ्या लहान मुलांना सांगण्यात आलं आहे की, दोस्तो नजर रखना अपने पापा पर! त्या व्हिडीओत एक मुलगी आणि तिचा बाबा आहे. बाबा बाहेर जायला निघाला आहे, तर त्याला एक छोटुशी मुलगी अडवते. आणि म्हणते, कहॉँ चले?
तर बाबा सांगतो, मी दोन दिवस घरातच तर बसलोय, कंटाळलोय !
त्यावर ती मुलगी म्हणते, बसा घरात, शर्माओ मत इसे अपनाही घर समझो !’ - आणि बाबांना पटवून देते की, घरातच राहणं आता
किती गरजेचं आहे! आणि आपल्या सगळ्या दोस्तांनाही सांगते की, ‘करना पडता है, प्रधानमंत्रीजी की बात को जो मनवाना है, इक्कीस दिन पुरे देश को घर में रहना है! दोस्तो नजर रख्खो अपने पापा पर!’ - तर हाच व्हिडीओ ट्वीट करून पंतप्रधानांनी सगळ्या मुलांनाच आवाहन केलंय, की तुम्हीपण असे कोरोना वॉरियर बना. मग बनणार ना? ही मोहीम आपण फत्ते करायलाच पाहिजे. काय.