बोअर झालंय? चला पृथ्वी रंगवून टाकू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 07:00 AM2020-06-04T07:00:00+5:302020-06-04T07:00:02+5:30
हाताने रंगवा पृथ्वी
हाताने रंगवा पृथ्वी
तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? जगात कुणीही हाताने पृथ्वी रंगवू शकत नाही. सुपर पॉवर्स असतील तरीही नाही. उगाच काहीतरी सांगतात. शिवाय आता लॉक डाऊन आहे, बाहेर कसं पडणार?
बरोबर पण आपल्याला प्रत्यक्ष पृथ्वी नाहीये. पण आपल्या पंज्याच्या ठश्यांनी पृथ्वी रंगवणार आहोत.
साहित्य:
एक मोठा गोल पांढरा कागद, इंद्रधनुष्याचे रंग, जुना रद्दीचा पेपर
कृती:
1) प्रत्येक रंग एका प्लेट मध्ये काढून त्यात पाणी घालून पातळ करून घ्या.
2) आता पांढरा कागदाचा गोल एका रद्दीच्या पेपरवर ठेवा.
3) आता तुमच्या उजव्या हाताचा पंजा एका कुठल्याही रंगात बुडवा आणि पांढ?्या कागदावर त्याचा ठसा घ्या. मग हात धुवून दुस?्या रंगात बुडवून त्याचा ठसा घ्या. तो गोल संपूर्णत: तुमच्या हाताच्या ठश्यांनी भरून ज्याला हवा.
4) ठसे घेताना बोटांचे ठसे व्यवस्थित येतील आणि कागदावर दिसतील असं बघा.
5) कागदावर ठश्यासाठी पंजा ठेवताना वेगवेगळ्या अँगल्समध्ये ठेवा.
6) आणि बघा, निरनिरळ्या रंगांनी सजलेली सुंदर पृथ्वी तुमच्या हातातून निर्माण होईल.