काडीची  होडी तुरुतुरू पळते , करून  पाहा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 11:29 PM2020-04-09T23:29:22+5:302020-04-09T23:31:25+5:30

घरातच फिरवा होडी

DIY : lock down- kids science games | काडीची  होडी तुरुतुरू पळते , करून  पाहा 

काडीची  होडी तुरुतुरू पळते , करून  पाहा 

googlenewsNext
ठळक मुद्दे काडी होडीसारखी आपोआप फिरू लागते

- राजीव तांबे

साहित्य : 3 आगपेटीतील काड्या. 1 चमचाभर द्रवरूप साबण. 1 छोटा चाकू.1 छोटा टब.5 लिटर पाणी.

तर करा सुरू :
1. चाकूने काडीच्या मागच्या बाजूस एक छोटासा छेद घ्या.
2. जिथे छेद घेतला आहे तिथे द्रवरुप साबणाचा एक थेंब टाका.
3. आता काडी टबमधील पाण्यात हलकेच सोडा.
4. काडी होडीसारखी आपोआप फिरू लागते. सरळ पुढे जाते.

असं का झालं :
1.द्रवरुप साबण घातलेल्या काडीचा भाग जिथे पाण्याला टेकतो त्या ठिकाणी साबण पाण्यात विरघळतो आणि त्या ठिकणचा पृष्ठीय ताण एकदम कमी होतो.
2. काडीच्या पुढील भागी जास्त ताण आणि मागील बाजूस कमी ताण असे असमान बल त्या काडीवर कार्य करते. यामुळे काडी पुढे जाते. छेदाची बाजू वळवली की पुढे जाण्याची दिशा बदलते.

Web Title: DIY : lock down- kids science games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.