पैचान कौन ? या पोटलीमध्ये लपलंय काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 05:45 PM2020-04-10T17:45:08+5:302020-04-10T17:49:13+5:30
दुपारी सगळे झोपल्यावर घरी बसून करायचे उद्योग
- राजीव तांबे
साहित्य : 1 कापडी पिशवी. 1 मी. दोरा आणि घरात सहज उपलब्ध असणार्या 25 गोष्टी.उदा :पेन्सिलीचा लहान तुकडा, पेनाच ेटोपण, खोडरबर, बटण, सुपारी, गोटी, पाच रुपयाचे नाणो, एक रुपयाचे नाणो, टुथपेस्टचे झाकण, छोटा कांदा, छोटा बटाटा, मोबाईल कव्हर इत्यादी. अशा सर्व 25 वस्तू एका कापडी पिशवीत भरायच्या.
पिशवीचे तोंड दोर्याने घट्ट बांधून टाकायचे.
घरातील दोन मुले हा खेळ खेळणार आहेत.
तर मग करा सुरू :
1.प्रथम 2 मिनिटांसाठी ही पिशवी पहिल्या मुलाला द्या.
2. त्याने पिशवीतील वस्त ूहाताने चाचपडून त्या कुठल्याअसतील हेओळखून लक्षात ठेवायचं.
3. मग कागदावर त्या वस्तूंची नावं लिहायची.
4. मग दुसर्या मुलाची पाळी.
5. जो 2 मिनिटात जास्तीत जास्त वस्तू ओळखेल आणि लिहिल तो जिंकला.
6. फक्त 2 मिनिटांत केवळ स्पर्शाने जास्तीतजास्त वस्तू ओळखणो हे या खेळातलं कौशल्य आहे.
7. ओळखलेल्या वस्तू लक्षात ठेवून पटापट लिहून काढणो हे या खेळातलंआव्हानआहे.
.....................................