कपात कुणी रोप लावतं का ? - हो! हे घ्या, असं लावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 11:11 PM2020-04-09T23:11:46+5:302020-04-09T23:15:27+5:30
do it yourself - दुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग
ठे बैठे क्या करें.. तर घरातल्याच गोष्टी वापरून एक छोटीशी गार्डन बनवूया.
साहित्य:
घरातले तुटके, फुटके कप, घरातल्याच कुंड्यांमधली थोडी माती. धणो, सुक्या मिरचीच्या बिया, पुदिन्याच्या काड्या, बडीशेप
कृती:
1) प्रत्येक कपमध्ये थोडी माती भरा.
2) त्यात तुम्हाला हव्या त्या वनस्पतीच्या बिया पेरा.
3) वरून परत थोडी माती घाला.
4) पाणी शिंपडा.
5) रोजच्या रोज या कप्सना ऊन आणि पाणी मिळेल असं बघा.
6) एक वही घ्या आणि त्यात प्रत्येक वनस्पतीच्या वाढीच्या नोंदी ठेवा.
7) याच वहीत वाढीच्या अवस्थांची चित्र काढा.
8) वनस्पती पूर्ण वाढतील तोवर तुमचाही एक मस्त प्रॉजेक्ट झालेला असेल.
9) या वाढलेल्या वनस्पती रोजच्या स्वयंपाकात वापरा.
1क्) शेतकरी शेतात किती राबत असतील याचा अंदाज तुम्हाला नक्की येईल.