पाण्याची माळ कधी  करता येते का ?-घ्या करुन पाहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 10:17 PM2020-04-09T22:17:07+5:302020-04-09T22:21:58+5:30

एका प्लेट मधे बफार्चे दहा खडे घ्या.

DIY - lock down time- water games @ home! | पाण्याची माळ कधी  करता येते का ?-घ्या करुन पाहा !

पाण्याची माळ कधी  करता येते का ?-घ्या करुन पाहा !

Next
ठळक मुद्देजास्त पाणी वितळल की गोठणबिंदू शून्याजवळ येतो. 

राजीव तांबे 

गारेगार  पाण्याची माळ
साहित्य : बर्फाचे 10 खडे, 1 मीटर. जाड दोरा, एक वाटी मीठ, एक चमचा, एक मोठी प्लेट.
तर मग करा सुरू :
1. एका प्लेट मधे बफार्चे दहा खडे घ्या.
2. एका बर्फाच्या खड्यावर अर्धा चमचा मीठ शिंपडा.
3. लगेचच त्या बर्फाच्या खड्यावर जाड दोरा आडवा ठेवायचा. 
4. आताहादोरा सावकाश खाली दाबायचा.
5. मग चार सेकंद थांबायचं व दोरा वर उचलायचा.
6. दोयरबरोबर बफार्चा खडा पण उचलला जाईल.
7. म्हणजेच आपल्या गारेगार माळेतला एक पाणी-मणी ओवला गेला.
8. असं भराभर केलं की. . झाली आपली पाण्याची माळ तयार !


असं का होतं?
1.बर्फाच्या तुकड्यावर दोरा ठेवून मीठ शिंपडल्यास बर्फ वितळून त्याचे पाणी बनत ेव दोरा खालीजातो. 
2. जास्त पाणी वितळल की गोठणबिंदू शून्याजवळ येतो. 
3. परत पाण्याच बर्फ होते आणि दोयार्ने बर्फ उचलता येते.
 

Web Title: DIY - lock down time- water games @ home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.