घरच्या घरी ट्रेकिंग करा, त्यासाठी ना डोंगर हवा , ना साहित्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 09:29 AM2020-04-10T09:29:11+5:302020-04-10T09:33:47+5:30
आज घरच्या घरी ट्रेकिंग!
ट्रेकिंगला कधी गेला आहात? डोंगर वगैरे चढला आहात? काय भन्नाट मजा येते ना? जेव्हा डोंगराची एखादी उभी चढण, छोटासा सरळसोट भाग, तेव्हा तो चढून जाताना एखादवेळेस तुमची फॅ फॅ ही झाली असेल.
म्हणजे चढणीचा हा टप्पा आता चढायचा तरी कसा?
मग तुम्ही तुमच्या आसपास त्या चढणीला कुठे खाचा आहेत का, तिथे पाय ठेवता येईल का, त्यावर बोटं रोवून वर जाता येईल का, असा अंदाज घेऊन चढणीचा हा टप्पा तुम्ही निश्चितच पार केला असेल.
आज हाच आपला व्यायाम आहे. चलो डोंगर चढनेको!. घराबाहेर जायचं नाहीये हे माहितीये मला, पण आज खरोखरच आपल्याला ट्रेकिंग, माऊण्टेनिअरिंग करायचंय.
आणि तेही घरच्या घरी!
चला, तर मग!
काय करायचं?-
1. जमिनीवर आपले दोन्ही हात आणि दोन्ही पाय टेका.
2. मनातल्या मनात असा विचार करा, ही जमीन आडवी नसून उभी भिंत आहे आणि आपण सुपरमॅन आहोत!
3. आता चढायला लागा ही भिंत.
4. हाताच्या कोपराजवळ आपला एक गुडघा वाकवून पुढे घ्या.
5. मग हात पुढे घेऊन दुसरा पाय. बघा, ट्रेकिंगचा फिल तुम्हाला येतो की नाही ते!
6. आज थोडा चढून बघा, नंतर हळूहळू प्रॅक्टिस वाढवा.
7. यामुळे तुमच्या हातापायात ताकद येईल. त्यांच्यातलं कोओॅर्डिनेशन वाढेल.
नंतर काही दिवसांनी खरोखरचा डोंगरही तुम्ही एकदम इङिाली चढून जाल!
- तुमची ‘डोंगरचढी’ मैत्रीण, ऊर्जा