चालवा डोकं, सोडवा कोडं मोबाईल गेमसारखं !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 03:17 PM2020-04-08T15:17:53+5:302020-04-08T15:24:16+5:30
स्क्रीन टाइम- ऑनलाइन सोडावा कोडी !
तुम्हाला कोडी आवडतात? खरं तर हा प्रश्नच विचारण्यात अर्थ नाही. कुणाला आवडत नाहीत कोडी? सगळ्यांच आवडतात. कोरोना ब्रेड
डाउननंतर सरकारने लॉकआउट जाहीर केलंय त्यामुळे सगळा बाजार बंद आहे. कुठलीही खेळण्यांची किंवा पुस्तकांची दुकानं चालू नाहीयेत अशावेळी बाजारात जाऊन पझल्स आणि पझल्सची पुस्तकं आणणं शक्य नाहीच. मग करायचं काय?
सारखा किती खेळ खेळणार? पुस्तकं वाचणार ना? पझल्स खेळायची असतील तर आता खेळण्यांची दुकानं नकोत, तुम्ही ऑनलाइन ही पझल्स खेळू शकता. अशा पझल्सच्या काही मस्त साइट्स आहेत. तिथे लहान मुलांसाठी ब्लॉक पझल्स, ङिाक्सो पझल्स, शोधा म्हणजे सापडेल कोडी, मेमरी गेम्स, शब्दकोडी, सुडोकू, चित्र शब्द कोडी आणि कितीतरी शैक्षणिक खेळ आणि कोडी आहेत.
ही सगळी कोडी तुम्ही ऑनलाइन सोडवू शकता. तुमचा वेळ त्यात खूप मस्त जाईल.
या साइट्स कशा शोधाल?
गूगलवर जा आणि काही शब्द देतेय ते वेगवेगळे टाइप करा. हे वेगवेगळ्या साइट्सचे कीवर्ड्स आहेत.
digipuzzle, hellokids, online puzzles for kids असं सर्च केलं की अजूनही साइट्स तुम्हाला
मिळतील. त्यातल्या तुम्हाला आवडतील त्या निवडा आणि कोडी सोडवा. मराठीही मध्येही काही साइट्स आहेत. मजेशीर कोडी
सोडवायला मदत होऊ शकते. त्यासाठी गूगलवर जाऊन मराठी कोडी असं मराठीतच टाइप करा. यासाठी हवं तर आईबाबांची मदत घ्या. मग काही साइट्स ओपन होतील जिथे मराठी कोडी आहेत. मग ती तुम्हीही सोडवा आणि घरच्यांना ही कोडी घाला. म्हणजे त्यांचाही वेळ मस्त जाईल.