अय्या ! खरंच फुलं लाजतात !-Try This
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 03:44 PM2020-04-08T15:44:20+5:302020-04-08T15:48:23+5:30
yes, its True बाटलीतली पांढरी फुले रंगीत होतात.
- राजीव तांबे
साहित्य : 12 निशिगंधाची फुलं. चार काचेच्या बाटल्या. छोटा चाकू किंवा कात्री. निळी शाई. लाल व हिरवा खाण्याचा रंग. चमचा.
तर करा सुरू :
1. चारही बाटल्यात योग्य तेव्हढे पाणी भरा.
2. पहिल्या बाटलीत निळ्या शाईचे दहा थेंब टाका व ढवळा.
3. दुस-या बाटलीत लाल रंग घालून ढवळा.
4. तिस-या बाटलीत हिरवा रंग घालून ढवळा.
5. आता फुलांच्या फांदीच्या तळाशी दोन सेंमी. अंतरावर तिरका छेद घ्या.
6. प्रत्येक बाटलीत 3-3 फुले ठेवा.
7. आता चार तासांनी गंमत पाहा.
8. सर्व बाटल्यातील फुले इतकी लाजतील. इतकी लाजतील की. आता त्या सर्व फुलांचे रंगच बदललेले असतील.
हे असं का होतं ?
बाष्पीभवन व केशाकर्षण या दोन तत्त्वांचा वापर करून बाटलीतले रंगीत पाणी गुरुत्वाकर्षणावर मात करून झाडाच्या सर्व भागात पोहोचते आणि ही बाटलीतली पांढरी फुले रंगीत होतात.