कलिंगड चीज सॅलड बनवायचं ? ही घ्या सोपी कृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 06:32 PM2020-06-08T18:32:06+5:302020-06-08T18:34:55+5:30
चला, आज काहीतरी खायची वस्तू बनवू!
सारखं सारखं क्राफ्ट करून कंटाळा येतो ना, मग आज आपण एक मस्त सॅलड करूया. डीआयवाय मध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टीही तुम्ही पुष्कळ करू शकता.
साहित्य: कलिंगड, चीज, मिरपूड, प्लेट
कृती:
1) कलिंगडाचे चौकोनी तुकडे करून घ्या. हे जरा स्किलच काम आहे पण तुम्हाला जमेल. चौकोनी ठोकळा कापा.
2) त्याच आकाराचा चीज स्लाईसचा तुकडा कापून घ्या.
3) आता कलिंगडाच्या चौकोनावर चीज स्लाइस ठेवा.
4) त्यावर मिरपूड भुरभुरवा.
5) चीजमध्ये मीठ असतं त्यामुळे वरून मीठ घालू नका. किंवा घातलं तरी थोडंच घाला. चीजमध्ये मीठ आहे हे लक्षात घेऊन भुरभुरवा.
6) फ्रिजमध्ये ठेवून थंड करा आणि झालं तुमचं कलिंगड चीज सॅलड.
7) जेव्हा मधल्यावेळी भूक लागते तेव्हा हे थंडगार सॅलड खायला एकदम मस्त वाटेल.