डुडल  करेंगे , डुडल  करेंगे ! पण  कसं ? - हे  असं .. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 07:45 AM2020-04-28T07:45:00+5:302020-04-28T07:45:01+5:30

दुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

Doodle, doodle! But how - make doodle like this...-lockdown- stay at home activity | डुडल  करेंगे , डुडल  करेंगे ! पण  कसं ? - हे  असं .. 

डुडल  करेंगे , डुडल  करेंगे ! पण  कसं ? - हे  असं .. 

googlenewsNext
ठळक मुद्देचला, आज करूया डूडल्स

तुम्ही कधी डूडल्स केली आहेत का? 
नसतील तर आज आपण डूडल्स करूया. 
साहित्य: 
पांढरा कागद, काळा पेन आणि रंग जेलपेन्स किंवा इतर कुठलीही रंगीत पेन्स 
कृती: 
सध्या उन्हाळ्याने अगदी तहान तहान होत असते. आईस्क्रीम खावंसं वाटतं. पण बाहेर जाऊन आईस्क्रीम आणता येऊ शकत नाही. मग आपण डुडल करत आयस्क्रीम तयार करूया की ! दुधाची तहान डुडलवर. 
1) आधी को?्या कागदावर आईस्क्रीमचे निरनिराळे आकार पेन्सिलने काढून घ्या. 
2) मग काळ्या पेनाने गिरवा. 
3) आता या आईस्क्रीम्सना आपण वेगवेगळ्या डिझाइन्सनी भरून टाकूया. 
4) ही डिझाइन्स तुम्ही गुगलवर बघूनही करू शकता. 
5) गुगलवर डुडल डिझाइन्स असं सर्च केलंत तर चिकार डिझाइन्स मिळतील. 
6) किंवा मेंदी काढताना कशी डिझाइन्स हातभार काढली जातात, ते आठवा. 


7) तीच डिझाइन्स तुम्ही या आईस्क्रीममध्येही वापरू शकता. 
8) किंवा सरळ उभ्या, आडव्या, तिरक्या रेषांची वेगवेगळ्या डिझाइन्स करू शकता. 
9) ही डिझाइन्स नक्षीकाम केल्यासारखी बारीक हवीत म्हणजे तुमचं आईस्क्रीम एकदम झक्कास दिसेल. 
10) आवडत असेल तर त्यात अधून मधून रंगही भरा. त्यासाठी रंगीत पेन्स, जेल पेन्स वापरा. मस्त दिसेल. 

Web Title: Doodle, doodle! But how - make doodle like this...-lockdown- stay at home activity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.