चष्मा समजा नाहीच घातला, तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 05:14 PM2020-06-15T17:14:46+5:302020-06-15T17:21:00+5:30

घराला बनवा तुमची प्रयोगशाळा

eye glasses, how it works. | चष्मा समजा नाहीच घातला, तर?

चष्मा समजा नाहीच घातला, तर?

googlenewsNext
ठळक मुद्दे चष्मा न घातल्यावर जग कसे दिसते?

साहित्य :
बहिर्गोल भिंग, चष्मा, रिकामे खोके, पाते, सपाट भिंत
कृती :
1. एक बहिर्गोल भिंग घ्या. (घरी कोणाचा वाचण्याचा चष्मा असेल तर त्याचे भिंग बहुदा बहिर्गोल असते.) हे भिंग म्हणजे डोळा मानू. 
2. एक खोके घ्या. त्याच्या मध्यावर बहिर्गोल भिंग खोचता येईल अशी भेग पाडा. भेगेत भिंग खोचा. 
3.खोके घेऊन घरातल्या कमी उजेडाच्या भिंतीपाशी जा. भिंग भिंतीला समांतर राहील अशा पद्धतीने खोक्याची एक बाजू भिंतीला टेकवा. भिंतीबाहेर दिसणारे दृश्य भिंतीवर स्पष्ट उमटेल अशा पद्धतीने खोके पुढे मागे हलवा. 
4. बाहेरच्या दृष्याची भिंतावरील प्रतिमा उलटी दिसते - वरची बाजू  तर डावी बाजू उजवीकडे असे दिसते. 


5. आता भिंगासमोर खोक्यावर चष्मा ठेवा. चष्म्याचे डावे किंवा उजवे भिंगच खोक्यावर खोचलेल्या बहिर्गोल भिंगासमोर येऊ द्या.  भिंतीवरची प्रतिमा अस्पष्ट होईल. खोके थोडे पुढे मागे सरकवून प्रतिमा स्पष्ट मिळवा. 
6. खोके त्याच जागी स्थिर ठेवून आता खोक्यावरचा चष्मा काढा. भितीवरची प्रतिमा पहा. 
7. ती प्रतिमा म्हणजे चष्मेवाल्यांना चष्मा न घातल्यावर जग कसे दिसते त्याची प्रतिमा आहे.
 

Web Title: eye glasses, how it works.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.