गरागरा फिरणारा साप पाहिलाय का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 07:30 AM2020-06-06T07:30:00+5:302020-06-06T07:30:02+5:30
घराला बनवा तुमची प्रयोगशाळा
साहित्य
जाड कागद, शिसपेन्सिल, कंपास, कात्री, दोरा, मेणबत्ती, काड्यापेटी.
कृती
1. एक जाड कागद घ्या. कंपास आणि शिसपेन्सिलीचा वापर करून त्या कागदावर एक 10 सेंटीमीटर त्रिज्येचे एक वतरुळ आखा. ते कात्रीने कापून घ्या.
2. या वर्तुळाच्या मध्यभागी 2 सेंटीमीटर त्रिज्येचे वतरुळ आखा. हे सापाचे डोके आहे अशी कल्पना करा.
3. केंद्रस्थानी सुमारे 5क् सेंटीमीटर लांबीचा दोरा ओवून बांधा.
4. शिसपेन्सिलीचा वापर करत आतल्या वतुर्ळापासून बाहेरच्या वतुर्ळापयर्ंत तीन वेटोळ्याची एक रेघ काढा.
5. या रेघेवरून कात्रीने मधल्या वतुर्ळापयर्ंत कापा. दोरी पकडून उंच धरा. साप उचलल्यासारखे दिसेल.
6. एक मेणबत्ती पेटवून जमिनीवर ठेवा.
7. उचललेली सापाची आकृती मेणबत्तीच्या वर एक वीत उंच धरा. ती गरागरा फिरेल.
असं का होतं?
सर्पिल आकारातून मेणबत्तीच्या ज्योतीची गरम हवा वर जाताना त्याला वतुर्ळाकार गती मिळते.