पुस्तक-खाऊ देणाऱ्या  हेडी टीचर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 07:00 AM2020-05-31T07:00:00+5:302020-05-31T07:00:07+5:30

त्यांनी वर्गातल्या प्रत्येक विद्याथ्र्यासाठी एक रीडिंग पॅकेट म्हणजे वाचनाच्या पुस्तकांचा एक संच तयार केला. आणि तो त्यांनी स्वत: प्रत्येकाच्या घरी जाऊन दिला.

heady robinson california - delivers books for children | पुस्तक-खाऊ देणाऱ्या  हेडी टीचर

पुस्तक-खाऊ देणाऱ्या  हेडी टीचर

Next
ठळक मुद्देत्यामुळे मुलं रोज काही ना काही वाचतात.

शाळेला सुट्टी लागून किती दिवस झाले. दिवस नाही खरंतर महिने म्हणायला हवं. शाळेमुळे लागलेल्या चांगल्या सवयीही अनेकांच्या जरा विसरायला झाल्या असतील. मग तुम्हाला कॅलिफोर्नियातील हेडी रॉबिन्सन या माहिती असायलाच हव्यात.  
हेडी या कॅलिफोर्नियातील एका शाळेत बालवाडीला शिकवतात. रोज शांळेत मुलांना भेटणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांच्याशी खेळणं आणि त्यांना लिहायला वाचायला शिकवणं हे हेडी यांना प्रचंड आवडतं. पण कोरोनामुळे हेडी यांना आपल्या प्रिय विद्याथ्र्यांना भेटताच येत नव्हतं. हेडी यांनी मुलांना वाचनाची सवय लावली होती. आपल्या विद्याथ्र्यांची ही सवय या लॉकडाऊनमुळे तुटायला नको असं त्यांना वाटत होतं. 
मुलांनी सुट्टीच्या काळातही वाचत राहायला हवं यासाठी हेडी यांनी एक उपाय योजला. त्यांनी वर्गातल्या प्रत्येक विद्याथ्र्यासाठी एक रीडिंग पॅकेट म्हणजे वाचनाच्या पुस्तकांचा एक संच तयार केला. आणि तो त्यांनी स्वत: प्रत्येकाच्या घरी जाऊन दिला. हेडी टीचर घरी येणार हे कोणालाच माहित नव्हतं. त्यामुळे हेडी टिचरला पाहून प्रत्येकाच्या चेहे:यावर आश्चर्याचे भाव उमटायचे. टीचरला असं अचानक समोर पाहून धक्का बसलेली मुलं मग टीचरला मीठी मारण्यासाठी धावायचे. पण हेडी कोरोनामुळे प्रत्येकाशी लांबूनच बोलायच्या. आणि आपण मुलांसाठी आणलेला पुस्तक खाऊ त्यांना देऊन हेडी पुढच्या विद्याथ्र्याच्या घरी जायला निघायच्या.
दर आठवडय़ाला एक नवीन संच  त्या त्यांच्या मुलांना देतात. त्यामुळे मुलं रोज काही ना काही वाचतात. आपली मुलं घरात असूनही वाचन आवडीनं करतात हे पाहून मुलांच्या आई बाबांनाही खूप आनंद झाला आहे.

Web Title: heady robinson california - delivers books for children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.