1रुपयाच्या नाण्य़ावर पाण्याचे किती थेंब राहू शकतात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 07:30 AM2020-05-06T07:30:00+5:302020-05-06T07:30:02+5:30
एक रूपयाचे नाणे , पेलाभर पाणी, ड्रॉपर
Next
ठळक मुद्देरुपयाभर पाणी
- मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
साहित्य एक रूपयाचे नाणे , पेलाभर पाणी, ड्रॉपर
कृती
1. एक रूपयाचे नाणे सपाट पृष्ठभागावर ठेवा.
2. शाई भरण्याच्या स्वच्छ ड्रॉपरमध्ये पाणी भरा.
3. त्यातून एक थेंब पाणी नाण्याच्या मध्यावर टाका.
4. त्याच्यावर आणखी थेंब पाणी टाका.
5. नाण्यावरून न सांडता किती थेंब पाणी नाण्यावर साचेल याचा अंदाज करा.
6. बहुधा तुमच्या अंदाजापेक्षा किती तरी अधिक पाणी नाण्यावर सामावेल.
असे का होते?
पाण्याच्या थेंबामध्ये परस्परांना जोडून घेण्याचा जोर असतो, तो गुरुत्त्वाकर्षणापेक्षा कमी झाला की पाणी ओसंडून वाहते.